Join us

सुशीलकुमार शिंदे यांच्या नातवाच्या अखंड प्रेमात बुडाली आहे जान्हवी कपूर, 'तो' फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 11:57 IST

अभिनेत्री ही शिखरच्या अखंड प्रेमात बुडाल्याचं दिसतंय.

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों... हे गाणे तुम्हाला आठवत असेल ना. असंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor ) हिने केलं आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया (Shikhar Pahariya) याचा फोटो आणि नाव प्रिंट असेलला शर्ट परिधान केल्याचं पाहायला मिळालं. यावरुन अभिनेत्री ही शिखरच्या अखंड प्रेमात बुडाल्याचं दिसतंय. तिचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. 

 जान्हवी कपूर ही शिखर पहारियाला डेट करत आहे. जान्हवीला शिखरसोबत अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर जान्हवीने जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुलीही दिली आहे.  जान्हवी कपूर अनेक मुलाखतींमध्ये तिचा प्रियकर शिखर पहारिया विषयी भरभरून बोलते. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूरने 'शिकू' नावाचा नेकलेस परिधान केला होता. आता जान्हवीने शिखरच्या नावाचे टीशर्ट घातले आहे. जान्हवीने परिधान केलेल्या या खास टी-शर्टवर शिखर पहारिया याचे नाव आणि त्याचा फोटो प्रिंटेड आहे. 

जान्हवीचा व्हायरल होत असलेला हा फोटो नाशिकमधील एका हॉटेलच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलाय. या फोटोत जान्हवीसोबत अभिनेता वरूण धवनही दिसतोय. नुकतंच जान्हवी आणि वरुण दोघे त्यांचा आगामी चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या सिनेमाच्या शुटिंगसाठी नाशिकमध्ये आले होते. यावेळी वरुण आणि जान्हवीने हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांसोबत काढलेला हा फोटो आहे. 

जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखरचं सोलापूराशी खास नातं आहे.  सोलापूर हे शिखरचे आजोळ आहे. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे. अर्थात प्रणिती शिंदे शिखरची सख्खी मावशी आहे.  

टॅग्स :जान्हवी कपूरबॉलिवूड