बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आपल्या संस्कृतीशी जोडलेली आहे. सिनेमात किंवा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये दिसणारी जान्हवी ही अनेकदा मंदिरांमध्ये देवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचेही दिसले आहे. अभिनेत्रीची आई सुपरस्टार श्रीदेवी या दक्षिण भारतातील होत्या. त्यांच्या अनेक प्रथा-परंपरांचं पालन करताना जान्हवी दिसून येते. देवावर विश्वास ठेवणाऱ्या जान्हवीने कुठल्या नव्या कामाची सुरुवात करताना तिरुपती दर्शन घेतले आहे. आता जान्हवीनं तिच्या 'परम सुंदरी' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी पुन्हा तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आहे. यावेळी तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रादेखील (Siddharth Malhotra) होता. याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
जान्हवीनं आज सकाळी सिद्धार्थसोबत तिरुपती दर्शन घेतलं. यावेळी दर्शनासाठी हिरव्या आणि जांभळ्या रंगाची साडी तिने नेसलेली. त्यावर सिव्हर ज्वेलरी, कपाळावर टिकली असा पारंपरिक लूक तिनं केला. यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. तर सिद्धार्थनं पारंपरिक वेष्टी परिधान केली होती. तिची ही धार्मिक बाजू पाहून चाहते अनेकदा तिचं कौतुक करतात.
याआधी बुधवारी संध्याकाळी सिद्धार्थने एक रील शेअर केला. ज्यात तो जान्हवीसोबत मंदिराच्या दिशेने चालताना दिसला. त्यात तो म्हणाला, "हॅलो गाइज, आम्ही तिरुपतीला जातोय. त्यावर जान्हवीनं लगेच 'तिरुमला, तिरुपती नाही' असं दुरुस्त केलं. पुढे सिद्धार्थ म्हणातो, "मी पहिल्यांदाच इथे आलो आहे, जान्हवी दरवर्षी येते आणि यावेळी माझी सुंदरी मला इथे घेऊन आलीय", असं म्हटलं.
'परम सुंदरी' (Param Sundari) सिनेमा येत्या २९ ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. '२ स्टेट्स'सिनेमाशी मिळतीजुळतीच याची कथा असल्याचं आधी टीझरमध्ये दिसून आलं होतं. तर आता सिनेमाचा ट्रेलरही भेटीला आला आहे. यामध्ये सिद्धार्थ-जान्हवीची रोमँटिक केमिस्ट्री, कथा, गाणी यांची झलक दिसत आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा असून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.