Join us

दादा कोंडकेंच्या 'ढगाला लागली कळ...' गाण्यावर थिरकले जान्हवी कपूर आणि वरूण धवन, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:21 IST

Janhvi Kapoor and Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा आगामी चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' येत्या २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. यात रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रादेखील वेगळ्या अवतारात पाहायला मिळणार आहेत. सध्या वरुण आणि जान्हवी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) यांचा आगामी चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' (Sunny Sanskari Ki Tulasi Kumari Movie) येत्या २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. यात रोहित सराफ (Rohit Saraf) आणि सान्या मल्होत्रा(Sanya Malhotra)देखील वेगळ्या अवतारात पाहायला मिळणार आहेत. सध्या वरुण आणि जान्हवी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. मुंबईतील एका गरब्याच्या ठिकाणी त्या दोघांनी प्रमोशन केलं. यावेळी ते दोघं दादा कोंडके यांच्या 'ढगाला लागली कळ...' (Dhagala Lagli Kal...) गाण्यावर थिरकले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ते दोघे मुंबईतील एका नवरात्री उत्सवात सामील झाले होते. तिथे त्यांनी त्यांचा आगामी चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चे प्रमोशन केले. तसेच त्यावेळी त्या दोघांनी 'ढगाला लागली कळ...' गाण्यावर ठुमकेदेखील लगावले. यावेळी वरूणने ऑफव्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती तर जान्हवीने लाल रंगाचा लेहंगा घातला होता. या लेहंग्यात ती खूपच सुंदर दिसत होती. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्स या बॅनरखाली झाली आहे. वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपटातील सहायक कलाकारांमध्ये मनीष पॉल, अक्षय ओबेरॉय आणि अभिनव शर्मा यांसह अनेक कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाची टक्कर ऋषभ शेट्टी यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'कांतारा: चॅप्टर १' या चित्रपटाशी होणार आहे. दोन्ही चित्रपट २ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Janhvi Kapoor and Varun Dhawan dance to Dada Kondke's song, video goes viral.

Web Summary : Varun Dhawan and Janhvi Kapoor promoted their upcoming film 'Sunny Sanskari Ki Tulasi Kumari' at a Navratri event in Mumbai. A video of them dancing to 'Dhagala Lagli Kal...' went viral. The film releases on October 2nd.
टॅग्स :जान्हवी कपूरवरूण धवन