‘जेम्स बॉण्ड’ बिग बी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 20:10 IST
७३ वर्षांचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठी काहीच अशक्य नाही, असेच म्हणायची वेळ आली आहे आता!! सत्तरी पार केलेले ...
‘जेम्स बॉण्ड’ बिग बी
७३ वर्षांचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठी काहीच अशक्य नाही, असेच म्हणायची वेळ आली आहे आता!! सत्तरी पार केलेले अमिताभ हे जेम्स बॉण्डच्या अवतारात उभे आहेत आणि हॉट कपड्यांतील सुंदर तरूणींनी त्यांना घेरलेले आहे, असे दृश्य तुम्ही इमॅजिन करू शकता? कदाचित नाही. पण आता एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर बिग बी अशा अवतारात दिसणार आहे. खुद्द बिग बींनी आपल्या ब्लॉगवर ही माहिती दिली. ‘आज सकाळी एका मॅगझीनसाठी फोटो शूट झाले. ते मला जेम्स बॉण्डच्या अवतारात दाखवू इच्छित होते. सुंदर तरूणींनी आपल्याला घेरलेले आहे, हे थोडे विसंगत वाटणाराच. पण कुठलीही बला येवो, सामना करावा लागणारच. तसेही ७४ वर्षांच्या वयात अशी संधी फार क्वचितच मिळते’ असे बिग बी यांनी लिहिले आहे.