Join us

'क्वांटिको'च्या भूमिकेसाठी 'जय गंगाजल'ची मदत - प्रियांका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:28 IST

'जय गंगाजल' साठी केलेली तयारी 'क्वांटिको'तील एफबीआय एजंटच्या भूमिकेसाठी फारच उपयोगाची ठरली, अशी कबुली प्रियांका चोप्रा हिने दिली आहे. ...

'जय गंगाजल' साठी केलेली तयारी 'क्वांटिको'तील एफबीआय एजंटच्या भूमिकेसाठी फारच उपयोगाची ठरली, अशी कबुली प्रियांका चोप्रा हिने दिली आहे. 'जय गंगाजल' मध्ये प्रियांका हिने पोलीस अधिकारी आभा माथुरची भूूमिका साकारली आहे. यात ती पिस्तुल तर कधी काठी घेऊन गुंडांचा मुकाबला करते. 'क्वांटिको' मध्ये प्रियंकाने फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशनमधील (एफबीआय) ऑफिसर अलेक्स पॅरिश ही भूमिका साकारली आहे.'जय गंगाजल'मध्ये दिग्दर्शक प्रकाश झा यांनी पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रकाश झा म्हणाले, आम्ही  प्रियांका चोप्राला भोपाळमध्ये प्रशिक्षित केले होते. त्याचा लाभ ' क्वांटिको' मध्ये झाला. प्रियांका ही लखनऊ, बरेली आदी शहरांत राहिली आहे. ती म्हणते, मी उत्तरप्रदेशात वाढली आहे, त्यामुळे ही भूमिका करणे मला सोपे गेले.