जॅकलीनचा स्टायलिश डबस्मॅश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 22:28 IST
बॉलीवूडमध्ये श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस आणि सोनम कपूर या दोघींना चांगल्या मैत्रिणी म्हणून ओळखले जाते. त्या नेहमीच पार्टीज, टिवटर ...
जॅकलीनचा स्टायलिश डबस्मॅश!
बॉलीवूडमध्ये श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस आणि सोनम कपूर या दोघींना चांगल्या मैत्रिणी म्हणून ओळखले जाते. त्या नेहमीच पार्टीज, टिवटर शेअरिंग, फोटो, व्हिडिओ, डबस्मॅश शेअर करत असतात. सोनम जेव्हा ‘नीरजा’चे प्रमोशन करत होती. तेव्हा जॅकलीनने डबस्मॅश व्हिडिओ बनवून तिला शेअर केले होते.जॅकलीन नेहमीच सोनम साठी प्रोत्साहन देण्यासाठी उभी असते. तिने नुकताच एक डबस्मॅश व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ती कॉफी आवडते म्हणून सांगत आहे. पण अत्यंत स्टायलिश आणि फनी असा हा डबस्मॅश वाटतो.इन्स्टाग्रामवर तिने हा डबस्मॅश पोस्ट केला आहे. सध्या ती ‘ढिशूम’ चित्रपटासाठी शूटिंग करते आहे. यात तिच्यासोबत जॉन अब्राहम आणि वरूण धवन हे देखील आहेत. चित्रपटातील अॅक्शन सीन्स आणि अॅडव्हेंचर्स याविषयी खूप बोलले जात आहे. https://www.instagram.com/p/BDDJwrfIp26/?taken-by=jacquelinef143