‘बागी2’मध्ये जॅकलिन की क्रिती??
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 17:17 IST
टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर अभिनीत ‘बागी’ला पे्रक्षकांची पसंती मिळाली आणि बॉक्सआॅफिसवर चित्रपट हिट राहिला. हिट म्हटल्यानंतर चित्रपटाचा सिक्वल ...
‘बागी2’मध्ये जॅकलिन की क्रिती??
टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर अभिनीत ‘बागी’ला पे्रक्षकांची पसंती मिळाली आणि बॉक्सआॅफिसवर चित्रपट हिट राहिला. हिट म्हटल्यानंतर चित्रपटाचा सिक्वल तर यायलाच हवा ना!! त्यानुसार दिग्दर्शक साबिर खान यांनी ‘बागी’च्या सिक्वलची तयारी सुरु केली आहे. या सिक्वलमध्ये टायगर श्रॉफ हाच लीड रोलमध्ये असणार, हे तर कन्फर्म आहे. मात्र टायगरच्या अपोझिट कुण्या अभिनेत्रीची वर्णी लागेल, हे अद्याप निश्चित नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बागी2’साठी जॅकलीन फर्नांडिस आणि क्रिती सॅनन या दोघींच्या नावांची चर्चा आहे. ‘अ फ्लार्इंग जट्’मध्ये टायगर व जॅकलीन ही जोडी लवकरच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. क्रिती आणि टायगर या दोघांची जोडी ‘हिरोपंती’मध्ये दिसली होती. त्यामुळे ‘बागी2’मध्ये टायगरसोबत कोण दिसेल, हे बघूच!