Join us

जॅकलीन म्हणते,‘माझ्यासाठी ‘हाऊसफुल्ल ३’ महत्त्वाचा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 13:25 IST

‘हाऊसफुल्ल २’ मध्ये जॉन अब्राहम सोबत मी आयटम साँग केले. आणि आता ‘हाऊसफुल्ल ३’ मध्ये अक्षय कुमार सोबत मुख्य ...

‘हाऊसफुल्ल २’ मध्ये जॉन अब्राहम सोबत मी आयटम साँग केले. आणि आता ‘हाऊसफुल्ल ३’ मध्ये अक्षय कुमार सोबत मुख्य अभिनय ही खरंतर माझ्या मेहनतीची पावतीच आहे, असे श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस हिने सांगितले आहे.‘हाऊसफुल्ल ३’ चित्रपट तिच्यासाठी किती महत्वाचा आहे हे सांगताना ती पुढे म्हणते,‘ मी खुप उत्सुक आहे. माझ्यासाठी हाऊसफुल्ल ३ मध्ये खुप भावना जोडल्या गेल्या आहेत.हाऊसफुल्ल ३ करायचा म्हटल्यावर मी निर्माता साजिद नादियाडवाला याला म्हटले की, हा चित्रपट मीच करणार. बिगबजेट चित्रपट, तगडी स्टारकास्ट, धम्माल कॉमेडी याला रसिकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखे आहे.