Join us

जॅकलीनला मिळाली नाही ‘बागी २’ ची आॅफर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 14:40 IST

 २०१६ हे वर्ष जॅकलीन फर्नांडिस हिच्यासाठी खुपच बिझी होते. ‘हाऊसफुल्ल ३’ आणि ‘ढिशूम’ च्या यशानंतर ती आता टायगर श्रॉफसोबतच्या ...

 २०१६ हे वर्ष जॅकलीन फर्नांडिस हिच्यासाठी खुपच बिझी होते. ‘हाऊसफुल्ल ३’ आणि ‘ढिशूम’ च्या यशानंतर ती आता टायगर श्रॉफसोबतच्या ‘अ फ्लार्इंग जट’ च्या रिलीज होण्याची वाट पाहते आहे. ‘टूटा जो कभी तारा’ या गाण्यातील त्याची जॅकलीनसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडली.रेमो डिसूजा दिग्दर्शित या चित्रपटात ते  दोघे प्रथमच एकत्र दिसत आहेत. टायगर श्रॉफच्या मुख्य भूमिकेतील ‘बागी २’ मध्ये कोण हिरोईन असणार ? याबद्दलही चांगलीच रस्सीखेच सुरू आहे.श्रद्धा कपूर, जॅकलीन फर्नांडिस की, कृती सेनन हे अद्याप निश्चीत नाही. जॅकलीनला जेव्हा विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली,‘ मला अद्याप बागी २ ची आॅफर आलेली नाही.’