Join us
Daily Top 2Weekly Top 5

​जॅकलिनची लकी चार्म !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 13:30 IST

बॉलीवुडच्या कलाकारांचा काही ना काही लकी चार्म असतो. त्यामुळं कुठेही गेले तरी ही मंडळी या गोष्टी कायम आपल्यासोबतच ठेवतात. ...

बॉलीवुडच्या कलाकारांचा काही ना काही लकी चार्म असतो. त्यामुळं कुठेही गेले तरी ही मंडळी या गोष्टी कायम आपल्यासोबतच ठेवतात. आता अशीच काहीशी बाब अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबाबतही समोर आलीय. जॅकलिनसाठी तिची लाल रंगाची बॅग बहुदा लकी चार्म आहे. कारण कुठेही गेली तरी जॅकलिन आपल्या या लाल रंगाच्या बॅगची साथ सोडत नाही. मग ते बॉलीवुडच्या पार्ट्या असो किंवा कुठे बाहेर फिरणं. नुकतंच फ्लाईंग जटच्या पार्टीतही जॅकलिन ही लाल रंगाची बॅग घेऊनच अवतरली.त्यामुळं आता तर मानलंच पाहिजे की जॅकलिनसाठी ही लाल रंगाची बॅग लकी चार्म आहे.काही दिवसांपूर्वी एअरपोर्ट वरही जॅकलिनने तीच लाल बॅग घेतली होती.बागीच्या सक्सेस पार्टीलाही जॅकलिनने लाला रंगाची बॅगसह हजेरी लावली.