Join us  

Jacqueline Fernandez: जॅकलीन फर्नांडिसला मुंबई विमानतळावर रोखले; मस्कतला जाणार होती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 9:01 PM

Jacqueline Fernandez Mumbai airport: जॅकलीन ही काही दिवसांपूर्वीच दीववरून 'राम सेतु' या सिनेमाचे शुटिंग आटोपून मुंबईत परतली होती. 10 डिसेंबरला रियादमध्ये सलमान खानच्या दबंग टुरमध्ये ती सहभागी होणार होती.

बॉलिवुडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) रविवारी मुंबई विमानतळावर मस्कतला जाण्यापासून रोखण्यात आले. ईडीने 200 कोटींच्या मनी लाँड्रींगप्रकरणी लूक आऊट सर्क्युलर काढल्याने जॅकलीनला पुन्हा घरी परतावे लागले आहे. 

जॅकलीन शोसाठी मस्कतला जात होती. मात्र, विमानतळावर जाताच तिला ताब्यात घेण्यात आले, आणि काही वेळाने कारवाई पूर्ण करून तिला घरी माघारी पाठविण्यात आले. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ईडीने जॅकलीन फर्नांडिसविरोधात 200 कोटी रुपयांच्या अफरातफरीप्रकरणी लुक आऊट सर्क्युलर जारी केले आहे. यामुळे विमानतळावरील इमिग्रेशन डिपार्टमेंटने तिला रोखले.

जॅकलीन ही काही दिवसांपूर्वीच दीववरून 'राम सेतु' या सिनेमाचे शुटिंग आटोपून मुंबईत परतली होती. 10 डिसेंबरला रियादमध्ये सलमान खानच्या दबंग टुरमध्ये ती सहभागी होणार होती. सुकेश चंद्रशेखर प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी जॅकलीनची दोनदा चौकशी केली होती. तेव्हा तिने आपल्याला या फसवणुकीत गुंतविण्यात आल्याचे म्हटले होते.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसअंमलबजावणी संचालनालय