Join us  

इमरातीत आग लागल्याच्या दुर्घटनेनंतर जॅकलीन फर्नांडिसने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, 'काल रात्री...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 12:49 PM

जॅकलीनच्या इमारतीत आग लागल्याने चाहते चिंतेत पडले होते.

श्रीलंकन ब्युटी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) मुंबईतील इमारतीला दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. १४ व्या मजल्यावर ही आग लागली तर जॅकलीन त्याच्याच वरती १५ व्या मजल्यावर राहते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले. दरम्यान जॅकलीनचे चाहते ती सुरक्षित आहे का या काळजीत पडले होते. आता जॅकलीनने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

जॅकलीन पोस्ट करत म्हणाली, "तुमची काळजी आणि प्रेमाबद्दल मी आभारी आहे. काल रात्री माझ्या इमारतीत आग लागली होती. सुदैवाने आम्ही सुरक्षित आहोत. माझे पाळीव प्राणीही सुरक्षित आहेत. सध्या मी कोलंबोमध्ये आहे. लीजेंड्स क्रिकेट ट्रॉफीच्या उद्घाटनासाठी आले आहे. आगीत अडकलेल्यांची सुखरुप सुटका करणाऱ्यांचीही मी आभारी आहे. तसंच तुम्ही माझ्यासाठी जी काळजी व्यक्त केलीत त्यासाठी आभार. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी सर्वकाही आहे आणि कायमच माझी ताकद राहिली आहे. देव भलं करो!"

जॅकलीन मुंबईत बांद्रा येथील पाली हिल या उच्चभ्रू भागात राहते.  नवरोज हिल सोसायटीतील १७ मजली इमारतीत ती १५ व्या मजल्यावर राहते. या घटनेची चौकशी झाल्यावर हे लक्षात आलं की १३ मजल्यावरील किचनमध्ये आग लागली होती. जॅकलीनसोबतच इमारतीतील सर्व लोक सुरक्षित आहेत.

वर्कफ्रंट

जॅकलीन फर्नांडिस लवकरच 'वेलकम टू जंगल' सिनेमात दिसणार आहे. तिचे गेले काही चित्रपट फारसे चालले नाहीत. 'राम सेतू','सर्कस','बच्चन पांडे' हे सिनेमे बॉक्सऑफिसवर फ्लॉप झाले.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसबॉलिवूडआगमुंबईसोशल मीडिया