Join us

​ जस्टीन बीबरला मुंबईची सैर घडवणार जॅकलिन फर्नांडिस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 15:22 IST

सिंगिंग सेन्सेशन जस्टीन बीबर लवकरच भारतात येऊन परफॉर्म करणार आहे. संपूर्ण जगाला वेड लावलेल्या या पॉप स्टारचा लाईव्ह शो ...

सिंगिंग सेन्सेशन जस्टीन बीबर लवकरच भारतात येऊन परफॉर्म करणार आहे. संपूर्ण जगाला वेड लावलेल्या या पॉप स्टारचा लाईव्ह शो मुंबईत आयोजित करण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे आणि येत्या मे महिन्यात जस्टीन आपल्याला स्टेजवर लाईव्ह गाताना दिसणार आहे. बीबरसोबत सनी लिओनीपासून सोनाक्षी सिन्हापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्स परफॉर्म  करणार असल्याचे तुम्ही ऐकले असेलच. आता एक नवी बातमी आहे. ती म्हणजे, जस्टीनच्या पाहुणचाराबद्दलची. होय, बॉलिवूडची हॉट गर्ल आणि श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस जस्टीनचा पाहुणचार करणार आहे. होय, यासाठी तिने अगदी देसी बेत आखल्याचे कळतेय.जस्टीनला मुंबई दर्शन घडवण्याचाही जॅकचा प्लान आहे. गेट वे आॅफ इंडिया, इस्कॉन मंदिर, कुलाबा कॉज वेसह वांद्रे फिल्मसिटीचे दर्शन घडवण्यासोबतच जस्टीनला धारावी झोपडपट्टीतील मुलांना भेटवण्याचीही तिची योजना आहे. जस्टीनसाठी खास महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन आणि गुजराती मेन्यूसह शाही मेजवाणीही ती देणार आहे. एकंदर काय तर जस्टीनच्या स्वागतासाठी जॅक अगदी सज्ज झाली आहे. आता जॅकचा हा देसी पाहुणचार जस्टीनला किती आवडतो, ते लवकरच कळेलच...नुकतेच बीबरने ‘अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स’मध्ये सर्वाधिक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. यामध्ये ‘व्हिडिओ आॅफ द इयर’ (सॉरी), ‘फेव्हरेट मेल आर्टिस्ट पॉप/रॉक’ आणि ‘फेव्हरेट अल्बम पॉप/रॉक’ या कॅटेगरीज्मध्ये त्याने बाजी मारली. ‘बेबी’ गाण्यामुळे प्रकाश झोतात आलेल्या जस्टीनने वयाच्या केवळ २२ व्या वर्षी ड्रेक, द विकेंड, एडेल यासारख्या दिग्गज कलावंतांना मागे टाकले.जस्टीन त्याच्या खासगी जीवनातील अफेयर्समुळेदेखील नेहमीच चर्चेत असतो. तसेच तो विलासी व सुखवस्तू जीवनशैलीसाठी तो ओळखला जातो. गेल्या वर्षी त्याने दिलखुलास पार्टी करण्यासाठी लंडनमध्ये एक आलिशान घर किरायाने घेतले आहे.