Join us

माधुरी दीक्षितच्या 'एक दोन तीन' वर थिरकणार जॅकलिन फर्नांडिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 12:03 IST

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी स्टारर चित्रपट बागीमध्ये जॅकलिन फर्नांडिस आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. हे गाणं तसे विशेष ...

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी स्टारर चित्रपट बागीमध्ये जॅकलिन फर्नांडिस आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. हे गाणं तसे विशेष आहे कारण माधुरी दीक्षितच्या 'एक दो तीन' या गाणाचे नवे व्हर्जन आहे.  लक्ष्मीकांत-प्यारेलालच्या संगीतावर तयार झालेल्या या गाणाला अलका याज्ञनिक यांनी गायले होते तर सरोज खान यांनी याची कोरियॉग्राफी केली होती. सरोज खान यांच्या या कोरियॉग्राफीला अहमद खान पुन्हा एकदा रिक्रिएट करणार आहेत जो बागी 2 चा दिग्दर्शक आहे. अहमदने 'चोली के पीछे' या गाण्यात सरोज खान यांचे असिस्टेंट म्हणून काम केले होते.  या नव्या व्हर्जनचे कोरियॉग्राफ गणेश आचार्य करणार आहे. गणेशने ऑरिजनल गाण्यात बॅक डान्सर म्हणून काम केले आहे.  अहमदने म्हणतो,  '''एक दो तीन' हे गाणं या चित्रपटात एकदम फिट बसते आहे. तसेच डिझायनर मनीष मल्होत्रा माधुरीच्या पिंक आऊटफिटला बघूनच जॅकलिनचा ड्रेस डिझाईन करणार आहे. जुन्या गाण्याच्या फिलसोबत एक नव व्हर्जन हवे आहे मला.''  माधुरीचे एक दोन तीन प्रेक्षक आजही विसरले नाहीत आहेत अनेक रिऑलिटी शोच्या मंचावर आजही हे गाणं सादर केले जाते. आता हेच गाणं नव्या व्हर्जनमध्ये जॅकलिन कसे करते हे आपल्याला लवकरच कळेल.   ALSO READ :   SHOCKING : लग्नाशिवाय आई व्हायला तयार आहे जॅकलिन फर्नांडिसबागी 2मध्ये टायगर व दिशाची लव्हस्टोरी कॉलेजपासून सुरु होते. पण दिशाचे टायगरऐवजी दुसºया तरूणासोबत विवाह होतो. मध्यंतरानंतर दिशाच्या पतीचा मृत्यू होतो. तिचीही हत्या होते आणि तिच्या मुलाचे अपहरण केले जाते. यानंतर टायगर या मुलाला वाचवतो. ‘बागी2’ हा ‘बागी’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. ‘बागी’मध्ये टायगरच्या अपोझिट श्रद्धा कपूर दिसली होती. यावेळी मात्र श्रद्धाच्या जागी दिशाची वर्णी लागली आहे. ‘बागी’मध्ये टायगर श्रद्धाला वाचवताना दिसला होता. पण ‘बागी2’मध्ये तो दिशाच्या मुलाला वाचवताना दिसेल. खरे ‘बागी2’साठी श्रद्धाही उत्सूक होती. पण दिशा व टायगरची रिअल लाईफ केमिस्ट्री कॅश करण्यासाठी मेकर्सने श्रद्धाला डच्चू देत दिशाला कास्ट केले. साजिद नाडियाडवाला बॅनरखाली तयार करण्यात येणार आहे.