Join us

लेकीची ओढणी सावरताना दिसले जॅकी श्रॉफ, क्षणात व्हायरल झाला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 15:54 IST

दिवाळीच्या मुहूर्तावर बच्चन कुटुंबाने एक ग्रॅण्ड पार्टी होस्ट केली. बॉलिवूड, क्रिडा अशा सर्वत्र क्षेत्रातील दिग्गजांनी या पार्टीला हजेरी लावली. या पार्टीचे अनेक फोटो व व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण यातील एका व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

ठळक मुद्दे25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते.

दिवाळीच्या मुहूर्तावर बच्चन कुटुंबाने एक ग्रॅण्ड पार्टी होस्ट केली. बॉलिवूड, क्रिडा अशा सर्वत्र क्षेत्रातील दिग्गजांनी या पार्टीला हजेरी लावली. या पार्टीचे अनेक फोटो व व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण यातील एका व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. होय, या व्हिडीओत जॅकी श्रॉफ आपल्या मुलीची ओढणी सावरताना दिसत आहेत. बापलेकीची एक सुंदर बॉन्डिंग या व्हिडीओत पाहायला मिळतेय.व्हायरल व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ त्याच्या आईसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर व शक्ती कपूर यांच्यासोबत फोटो काढण्यात मग्न आहे. दुसरीकडे जॅकी श्रॉफ मुलगी कृष्णाची ओढणी नीट करताना दिसत आहेत.  

25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. टायगर वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अ‍ॅॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते. सध्या कृष्णा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहेत. 

  काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेन्डला किस करतानाचे तिचे फोटो व्हायरल झाले होते.  कृष्णा व एबन लवकरच विवाहबंधनात अडकणार असेही मानले जात आहे. दोघांनी साखरपुडा केल्याचीही चर्चा आहे.  एबन हा एक आॅस्ट्रेलियन बॉस्केटबॉल प्लेयर आहे. त्याच्याकडे आॅलिया, इस्राईल व भारताचे नागरिकत्व आहे. एका ताज्या मुलाखतीत कृष्णाने तिच्या आयुष्यात एक व्यक्ती असल्याची कबुली दिली होती. मी ज्याच्यासोबत आहे, आनंदी आहे. मला काहीही लपवण्याची गरज नाही, असे ती म्हणाली होती. यानंतर सोशल मीडियावर एबनसोबतचे अनेक फोटो तिने शेअर केले होते.

टॅग्स :जॅकी श्रॉफ