Join us

​जॅकी चॅन का पळतोयं दिशा पटानीपासून दूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 13:24 IST

अभिनेत्री दिशा पटानीचे गतवर्ष अतिशय चांगले गेले. दिशाचा पहिला-वहिला बॉलिवूड डेब्यू असलेला चित्रपट म्हणजे ‘एम एस धोनी: दी अनटोल्ड ...

अभिनेत्री दिशा पटानीचे गतवर्ष अतिशय चांगले गेले. दिशाचा पहिला-वहिला बॉलिवूड डेब्यू असलेला चित्रपट म्हणजे ‘एम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’. या चित्रपटात दिशा सुशांतसिंह राजपूतसोबत दिसली. बॉक्सआॅफिसवर हा सिनेमा हिट राहिला.  या चित्रपटासाठी दिशाला बेस्ट डेब्यू अवार्डही मिळाले. यामुळे गतवर्षात दिशाला यशाची चव चाखता आली. याशिवाय टायगर श्रॉफसोबतच्या तिच्या रिलेशनशिपचीही बरीच चर्चा झाली. टायगरसोबतचा तिचा म्युझिक अल्बमही बराच गाजला. एकंदर काय तर गतवर्षात दिशा या ना त्या कारणाने कायम चर्चेत राहिली. नव्या वर्षातही दिशा चर्चेत आलीय. पण एका वेगळ्या कारणाने. होय, मार्शल आर्ट कुंग फू एक्सपर्ट आणि सुपरस्टार जॅकी चॅन सध्या दिशाच्या वागण्यामुळे चांगलाच वैतागला असल्याची बातमी आहे. यामुळेच दिशा चर्चेत आहे.जॅकी चॅन यांच्या ‘कुंग फू योगा’ या चित्रपटात दिशा पाटणी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. पण या चित्रपटाच्या सेटवरचे दिशाचे अति फ्रेन्डली वागणे मात्र जॅकी चॅनला बरेच खटकू लागले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सेटवर दिशा जॅकी चॅनसोबत अति फ्रेन्डली वागते. आपण जॅकीच्या किती जवळचे आहे, हे दाखवण्याचा तिचा खटाटोप असतो. दिशाचे हे असे विचित्र वागणे चित्रपटाच्या क्रू मेंबर्ससाठी धक्कादायक आहेत. जॅकी चॅन तर तिच्या या वागण्यामुळे कमालीचा वैतागला आहे. आता एखाद्या ‘चिपको’ माणसापासून पिच्छा सोडवण्यासाठी आपण काय काय करतो. नेमके तेच जॅकी चॅन सध्या दिशापासून पिच्छा सोडवण्यासाठी करतोय. आता दिशा अशी का वागतेय, हे तिचे तिलाच ठाऊक़ कदाचित बॉलिवूडमध्ये नवी असल्याने ती हरकून गेली असावी. पण दिशा इतके हरकणेही बरे नव्हे...तेव्हा आत्ताच सावर बाई!!