जॅकी चैनला करायचेय बॉलिवूडमध्ये काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 17:28 IST
जगभरातील प्रत्येक कलाकाराला बॉलिवूडने भूरळ पाडली आहे. मग तो कलाकार जगातील कुठल्याही कोपऱ्यातला असो. असाच एका हॉलीवूडच्या अॅक्शन हिरोने ...
जॅकी चैनला करायचेय बॉलिवूडमध्ये काम
जगभरातील प्रत्येक कलाकाराला बॉलिवूडने भूरळ पाडली आहे. मग तो कलाकार जगातील कुठल्याही कोपऱ्यातला असो. असाच एका हॉलीवूडच्या अॅक्शन हिरोने बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून ही व्यक्ती आहे जॅकी चैन. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. जॅकी चैनने बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला फक्त बॉलिवूड चित्रपटात काम करायचे नाही आहे तर त्याला बॉलिवूड चित्रपटात त्याला रोमांस करायचा आहे. ‘कुंग फू योगा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जॅकी चैन भारतात आला होता. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांने ही इच्छा व्यक्त केली. बॉलिवूडमधील सलमान खान, आमिर खान हे त्याचे आवडते हिरो आहेत. जॅकी चैन हा त्याच्या कॅमेडी अॅक्शनमुळे ओळखले जाते. गेल्या वर्षी त्यांने ऑस्करवर ही आपले नाव कोरले. जॅकीला वडापाव आणि बटर चिकन खूप आवडत असल्याचे त्यांने या भेटीदरम्यान सांगितले. या पत्रकार परिषदे दरम्यान त्याचे चित्रपटातील इतर सह कलाकार ही उपस्थित होते. अमायरा दस्तूर हिने यावेळी जॅकी हा स्वच्छता प्रिय व्यक्ती असल्याचे सांगितले. त्याला कुठेही कचरा दिसला तर तो स्वत: उचलतो. तर दिशा पटानी म्हणाली तो सेटवर सांताक्लोझ असतो तो प्रत्येकाची काळजी घेतो. प्रत्येकासाठी तो काहीना ना काही तरी खाण्यासाठी घेऊन येतो. त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचे दीक्षा म्हणाली. तर सोनू सूदने जॅकी चैन बरोबर काम करुन आपले एक स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटले. सलमान खाननेही जॅकी चैनची भेट घेतली. त्यांने या भेटीदरम्यानचे फोटो सोशलमीडियावर शेअर केले.