Join us
Daily Top 2Weekly Top 5

​Jab Harry Met Sejal mini trail 3 : का भांडताहेत शाहरूख खान अन् अनुष्का शर्मा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 13:17 IST

शाहरूख खान व अनुष्का शर्मा स्टारर ‘जब हॅरी मेट सेजल’चे मिनी ट्रेलर रिलीज होत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाचे दोन लहान लहान ट्रेलर आपण बघितलेत. आज या चित्रपटाचा तिसरा मिनी ट्रेलर रिलीज झाला.

शाहरूख खान व अनुष्का शर्मा स्टारर ‘जब हॅरी मेट सेजल’चा ट्रेलर सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’सोबत येत्या २३ जूनला रिलीज होणार आहे. पण यापूर्वी ‘जब हॅरी मेट सेजल’चे मिनी ट्रेलर रिलीज होत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाचे दोन लहान लहान ट्रेलर आपण बघितलेत. आज या चित्रपटाचा तिसरा मिनी ट्रेलर रिलीज झाला. यात शाहरूख खान व अनुष्का शर्मा दोघेही केवळ भांडताना दिसत आहेत. ३६ सेकंदाच्या या व्हिडिओत अनुष्का काहीसी जिद्दी दिसतेय. शाहरूख आधी तिला तिचा हट्ट सोडायला सांगतो आणि नंतर तिला बरेच भले-बुरे बोलतो. व्हिडिओत शाहरूख खान पंजाबीत राग व्यक्त करतोय. तर अनुष्का गुजराती तोºयात बोलतेय. व्हिडिओतील दोघांची केमिस्ट्री लाजवाब आहे.अनुष्काने ‘जब हॅरी मेट सेजल’चा हा तिसरा मिनी ट्रेलर तिच्या सोशल अकाऊंटवरून जारी केला आहे. ‘हॅरी, प्रत्यक्षात तुला सगळ्याच गोष्टींपासून समस्या आहे. आता तुला काय अडचण आहे?’ असे कॅप्शन तिने हा ट्रेलर पोस्ट करताना दिले आहे. शाहरूखने लगेच याला उत्तर दिले आहे. ‘एक्सक्यूज ये है की, मैं कॅरेक्टर हू ए1’ असे शाहरूखने लिहिलेय.‘जब हॅरी मेट सेजल’च्या निमित्ताने प्रथमच शाहरूख खान, अनुष्का शर्मा व इम्तियाज अली एकत्र आले आहेत. शाहरूखला या वर्षांत एका हिटची गरज आहे. त्यामुळे शाहरूखला या चित्रपटाकडून ब-याच अपेक्षा आहेत. आता त्याच्या या अपेक्षा किती पूर्ण होतात, ते आपण लवकरच बघणार आहोत. तोपर्यंत ‘जब हॅरी मेट सेजल’चा हा तिसरा मिनी ट्रेलर तुम्ही नक्कीच पाहायला हवा.