It's Time to Journey : शाहरुख खान करणार मुंबई-दिल्ली रेल्वे प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 20:05 IST
शाहरुख खान आपल्या ‘रईस’ या चित्रपटाचे प्रमोशन रेल्वेने करणार आहे, हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल! पण हे खरे ...
It's Time to Journey : शाहरुख खान करणार मुंबई-दिल्ली रेल्वे प्रवास
शाहरुख खान आपल्या ‘रईस’ या चित्रपटाचे प्रमोशन रेल्वेने करणार आहे, हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल! पण हे खरे आहे. बॉलिवूड अभिनेते आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भन्नाट शक्कली लढवित असतात. या माध्यमातून आपल्या फॅन्स् सोबत संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान देखील आपल्या आगामी रईस या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहे. या व्यस्त कार्यक्र मातूनही वेळ काढून शाहरुखने मुंबई ते दिल्ली प्रवास रेल्वेने करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य म्हणजे रेल्वेने प्रवास करणारा शाहरुख बॉलिवूडमधील खान त्रिकुटातील पहिला स्टार ठरणार आहे. सध्या चर्चेत असलेल्या बातम्यानुसार, शाहरुख खान आपल्या आगामी रईस या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीला जाणार आहे. हा प्रवास करण्यासाठी त्याने रेल्वे मार्गाला पसंती दिली आहे. ही बातमी खरोखरच मजेदार आहे कारण शाहरुख ट्रेनमधून प्रवास करताना तो आपल्या चाहत्यांसोबत व प्रवाशांसोबत चांगलीच मस्ती करणार यात शंकाच नाही. रईस या चित्रपटात शाहरुख खान अशा व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे जो आपल्या मुळाशी नाळ जोडून आहे. अशा वेळी रेल्वे हेच एकमेव साधन आहे, ज्या माध्यमातून हा संदेश देता येतो. या प्रवासाच्या माध्यमातून शाहरुख आपल्या चाहत्यांशी संवाद साधणार आहे. Read More : रईस- काबिलमध्ये या गोष्टींचे आहे साम्य याच वर्षी शाहरुख खान बॉलिवूड करिअरचे २५ वे वर्ष साजरे करणार आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला शाहरुख खान याने दिल्ली - मुंबई प्रवास रेल्वेनेच केला होता. दीर्घ कालावधीनंतर शाहरुख खान रेल्वेने प्रवास करणार आहे हे देखील विशेष. यामुळे त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. शाहरुख खान सोबत रईसचे निर्माता रितेश सिधवानी व दिग्दर्शक राहुल ढोलकिया देखील प्रवास करणार आहेत. संपूर्ण टीम रेल्वेने प्रवास करणार असल्याने सर्वच उत्सुक आहेत. दिल्लीत सध्या थंडी असल्याने सर्वांनी गरम कपडे आपल्यासोबत घेतले आहेत असेही सांगण्यात येते. Read More : war begins with advance booking : ‘काबिल’चा पहिला शो ‘रईस’ सोबतचALSO READ : ‘रईस’ शाहरुख खानने घेतली जबरा फॅन शाम बहादूरची भेटशाहरूखच्या पठाणी स्टाइलवर फॅन्सच नव्हे तर हे स्टार्सही झाले फिदा!