Join us

या प्रसिद्ध अभिनेत्याला तोंड लपवत फिरण्याची आली वेळ, हे आहे त्यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 15:11 IST

शाहिदच्या ओठांवर आणि हनुवटीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याचा चेहरा सुजला आहे.

शाहिद कपूर 'कबीर सिंग' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडले. आता पुन्हा एकदा रसिकांचे भरघोस मनोरंजन करण्यासाठी  शाहिद कपूर पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. सध्या तो आगामी सिनेमा 'जर्सी'चे शूटिंग करत आहे. या सिनेमात शाहिद आपल्याला एका क्रिकेटरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण चंडीगढमध्ये सुरू असून या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान शाहिदला दुखापत झाली आहे. दुखापत झाल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. चित्रीकरण अर्धावर सोडून त्याला मुंबईत गाठावी लागली. इतके दिवस रखडलेले शूटिंग पूर्ण करण्यासाठी  पुन्हा चंदिगढला जावे लागले. 

अलिकडेच शाहिद मीरासह मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी शाहिदने त्याचा चेहरा झाकला होता. शाहिदच्या ओठांवर आणि हनुवटीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याचा चेहरा सुजला आहे. असा दुखापत झालेला चेहरा कोणाला दिसू नये म्हणून त्याने चेहरा लपवण्याची शक्कल लढवली असावी. यावेळी त्याची काळजी घेण्यासाठी मीराही त्याच्याबरोबर गेली आहे.

‘जर्सी’ हा सिनेमा एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. ‘जर्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गौथम तिन्नानूरी यांनी केले असून हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही तेच करणार आहेत. शाहिदचे वडील पंकज कपूरही यात कोचची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सिनेमात भारतीय क्रिकेट संघात सहभागी होण्यासाठी अर्जुनचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. आता हाच संघर्ष शाहिद कपूर पडद्यावर जिवंत करणार आहे. शाहिदचा हा सिनेमा 28 ऑगस्ट 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टॅग्स :शाहिद कपूर