Join us

​प्रेक्षकांनी मला स्वीकारले तेच महत्त्वाचं - सनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 13:45 IST

सनी लिओन जेव्हा इंडस्ट्रीमध्ये एका टीव्ही रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून आली तेव्हा प्रचंड गदारोळ माजला होता.पूर्वाश्रमीची पोर्नस्टार सनीने तिचा ...

सनी लिओन जेव्हा इंडस्ट्रीमध्ये एका टीव्ही रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून आली तेव्हा प्रचंड गदारोळ माजला होता.पूर्वाश्रमीची पोर्नस्टार सनीने तिचा भूतकाळ लपविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. तिच्या अशा बोल्ड आणि डेअरिंग वृत्तीमुळे तिच्याविषयी असणारे अनेक समज-गैरसमज, अफवा, गॉसिप सर्व काही गळून पडले.ती आज अभिमानाने सांगते की, ‘प्रेक्षकांनी मला स्वीकारलं आहे. सुरूवातीला आल्यावर मला खूप बोलणी, टोमणे, पूर्वग्रहांना सामोरे जावे लागले. एका अर्थाने स्वाभाविक होते. परंतु आज मी खंबीरपणे सांगू शकते की, आता परिस्थिती बदलली आहे. निर्माते-दिग्दर्शक माझ्याकडे चांगल्या कथा घेऊन येत आहेत.हे सर्व कस झालं असे विचाराल तर, एक म्हणजे मी जशी आहे तशीच इमेज सर्वांसमोर ठेवते. कुठेही आव आणत नाही. बहुधा माझ्या विचारांचा बोल्डपणा लोकांना भावत असेल.’सनीचे असे सडेतोड बोलू ऐकून खरंच तिने आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवले आहे हे तर मान्यच करावे लागेल.