Join us

​इट्स कनफर्म! अनुष्का - शाहरुख पुन्हा एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 10:48 IST

इम्तियाज अलीच्या पुढच्या सिनेमात शाहरख आहे हे तर सर्वांनाच माहित आहे.या चित्रपटात मात्र किंग खानची लीडिंग लेडी कोण ...

इम्तियाज अलीच्या पुढच्या सिनेमात शाहरख आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. या चित्रपटात मात्र किंग खानची लीडिंग लेडी कोण असणार याबाबत उत्सुकता होती.दीपिका आणि अनुष्काची नावे यामध्ये सर्वात पुढे होती. परंतु दोघींनी याविषयावर बोलण्याचे टाळणे पसंत केले होते. पण अखेर खुद्द अनुष्कानेच या रहस्यावर पडता उचलला आहे.अनुष्काने माहिती दिली की, ती लवकरच शाहरुखसोबत इम्तियाज अलीच्या पुढच्या सिनेमाची शुटिंग सुरू करणार आहे. माझे वेळापत्रक एवढे व्यस्त आहे की, मला एक दिवसाची सुटी घेणेदेखील शक्य नाही. त्यामुळे याआधी मी याबाबत बोलायचे टाळत होते.अनुष्काने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण शाहरुखसोबत ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून केले होते. त्यानंतर दोघांनी ‘जब तक है जान’मध्ये एकत्र काम केलेले आहे.आता त्यांची फ्रेश जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार म्हटल्यावर चाहते एकदम खुश झाले आहेत.