आयटम गर्ल सनी लिओनीला ‘याचा’ आहे शौक, वाचाल तर दंग रहाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 18:27 IST
पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास केलेली सनी लिओनी दर दिवसाला कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. आज ...
आयटम गर्ल सनी लिओनीला ‘याचा’ आहे शौक, वाचाल तर दंग रहाल!
पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास केलेली सनी लिओनी दर दिवसाला कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. आज ती तिच्या महागड्या शौकमुळे चर्चेत आली आहे. होय, सनीचे शौक वाचाल तर तुम्ही दंग रहाल. सनीने सांगितले की, मला गॅझेट्सचा वापर करण्याचा खूप शौक आहे. ज्या पद्धतीने आॅटोमोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात अत्याधुनिक गॅझेट्सची निर्मिती केली जात आहे, त्यावरून मी खूपच प्रभावीत आहे. सनी ‘बिग ब्वॉयज ट्वायज एक्सपो’च्या चौथ्या समारंभात सहभागी झाली होती. सनीने आयएएनएसशी बोलताना म्हटले की, ‘मला जबरदस्त स्पीड असलेल्या कार, स्पोर्ट्सबाइक आणि गॅझेट्स खूप आवडतात. मी असे ऐकले होते की, ‘बिग ब्वॉयज ट्वायज एक्सपो’मध्ये हे सर्व काही असेल. त्यामुळेच मी या समारंभात सहभागी झाले.’ या सर्व गॅझेट्सचा मला शौक असल्याचेही सनीने यावेळी सांगितले. इव्हेंट कॅपिटल, लक्ष लाइव्ह एक्सपीरियंसेज आणि यश एक्सपोच्या पहिल्या सत्रात आयोजित केलेल्या शोमध्ये सनी सहभागी होणार आहे. या तीन दिवसीय शोचे शुक्रवारी मुंबई येथील मुंबई मेट्रोपालिटन रीजन डिव्हलपमेंट अथॉरिटीच्या (एमएमआरडीए) मैदानावर आयोजित केले आहे. गॅझेट्सप्रती सनीचे असलेले प्रेम सांगताना ती म्हणाली की, ‘मला सुरुवातीपासूनच गॅझेट्स आवडतात. शिवाय ज्या पद्धतीने आॅटोमोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात प्रगती होत आहे, त्यावरून भविष्यात आणखीही अत्याधुनिक गॅझेट्स बाजारात येण्याची शक्यता आहे. गॅझेट्समुळे मानवाचे जीवन अधिक सुसह्य झाले आहे. सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याचेही सनीने सांगितले. दरम्यान, सनीचा आयटम नंबर असलेला ‘भूमी’ हा चित्रपट उद्या रिलीज होत आहे. चित्रपटातील तिचे हे गाणे प्रेक्षकांकडून चांगलेच पसंत केले जात आहे. सेन्सॉरने या गाण्यावर कात्री लावल्याचीही बातमी समोर आली होती. त्याचबरोबर सनीचे अक्षय देवगण स्टारर ‘बादशाहो’मधील इमरान हाशमीबरोबरचे आयटम नंबर हिट झाले. शिवाय अरबाज खानची मुख्य भूमिका असलेला तिचा ‘तेरा इंतजार’ हा चित्रपटही लवकरच रिलीज होणार आहे. सनी सध्या इंडस्ट्रीमध्ये आयटम नंबरसाठी ओळखली जात आहे.