Join us

​‘आयटम गर्ल आहे, पॉर्नस्टार तर नाही- राखी सावंत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 13:38 IST

राखी सावंतचा नवीन चित्रपट ‘एक कहानी जूली की’ प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे, जो शीना बोरा हत्याकांडावर आधारित आहे. राखी ...

राखी सावंतचा नवीन चित्रपट ‘एक कहानी जूली की’ प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे, जो शीना बोरा हत्याकांडावर आधारित आहे. राखी सावंत या चित्रपटाच्या प्रमोेशनामध्ये खूपच व्यस्त आहे. विशेष म्हणजे या दरम्यान तिने जे काही वक्तव्य केले त्यामुळे ती अधिकच चर्चेत आली आहे. तिने सरळ आपल्या वक्तव्याद्वारे सेन्सॉर बोर्डाला धारेवर धरले आहे. राखी सावंतच्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने एडल्ड सर्टिफिकेट दिले असून राखी खूपच संतापली आहे. तिने म्हटले आहे की, आयटम गर्ल असल्यामुळे असे करण्यात आले आहे. मात्र कमीत कमी पॉर्नस्टार तर नाही.सेन्सॉर वर आपला रोष व्यक्त करताना पूढे म्हणाली की, ‘मी पहलाज निहलानीच्या घरात जाऊन त्याला खूर्ची वरुन खाली खेचेल आणि स्वत: त्याची जागा घेईल. विशेष म्हणजे मी त्याच्यापेक्षा चांगले काम करु शकते. माझ्याजवळ पैसे नसल्याने माझ्या चित्रपटाला एडल्ट करार दिला. या लोकांना अडचण ही आहे की, या देशाची एक मुलगी, आयटम गर्ल पासून एक हिरोईन बनली आहे. चांगले हे आहे की, मी पॉर्नस्टार तर नाही.’