Join us  

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘रोमारोमात’ भिनलेली ती तरूणी निघाली इटालियन अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 10:22 AM

काल नवाजुद्दीन सिद्दीकीने एका अनोळखी मुलीसोबतचा फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली होती. ही मुलगी माझ्या रोमारोमात भिनलीयं, असेही नवाजने सांगितले होते. 

काल नवाजुद्दीन सिद्दीकीने एका अनोळखी मुलीसोबतचा फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली होती. ही मुलगी माझ्या रोमारोमात भिनलीयं, असेही नवाजने सांगितले होते. साहजिकचं नवाजच्या या अशा अनपेक्षित वागण्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.  नवाजच्या रोमारोमात भिनलेली ही सुंदर तरूणी कोण, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. नवाजचे व तिचे नाते काय, हाही प्रश्न होता. पण आता या प्रश्नांचे उत्तर मिळाले आहे. होय, नवाजसोबत दिसलेली ही सुंदर तरूणी दुसरी तिसरी कुणी नसून इटालियन अभिनेत्री व्हॅलेन्टिया कोर्टी आहे. तिची दुसरी ओळख म्हणजे, ती नवाजच्या आगामी चित्रपटाची हिरोईन आहे.

 अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी ही या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवतेय. तिने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात नवाज आणि व्हॅलेन्टिना एकत्र दिसणार आहेत. तूर्तास या चित्रपटाचे नाव कळले नाही. चित्रपटाची कथा, त्यातील स्टारकास्टही हेही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.सध्या रोममध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला नवाज व व्हॅलेन्टिनाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल, अशी अपेक्षा आहे.तूर्तास नवाजुद्दीन ‘मन्टो’ या चित्रपटात बिझी आहे.  या चित्रपटात तो प्रसिद्ध लेखक सआदत हसन मन्टो यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.  बॉलिवूडच्या तिन्ही 'खान' आणि अन्य दिग्गजांसोबत काम केल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आता सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत दिसणार आहे.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी