ALSO READ : महानायकाला ‘चांदनी’ निखळणार याची कुणकुण लागली होती?, बिग बींच्या एका पोस्टने चर्चांना उधाण
श्रीदेवींच्या निधनापूर्वी अमिताभ यांनी एक पोस्ट लिहिली होती. ‘न जानें क्यों अजीबसी घबराहट हो रही हैं’, असे त्यांनी लिहिले होते. त्यानंतर काहीच तासांत श्रीदेवींच्या मृत्यूची बातमी वाºयासारखी पसरली होती. अमिताभ यांनी श्रीदेवींच्या मृत्यूची कुणकुण तर लागली नव्हती ना, असा सवाल त्यामुळे सर्वत्र चर्चिला गेला होता. श्रीदेवींच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची बातमी बिग बींना दिली होती का? अशीही शंका उपस्थित करण्यात आली होती. श्रीदेवींच्या निधनानंतर अमिताभ कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्या दिवशी यांनी ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाचे शूटींगही रद्द केले होते. बिग बी व श्रीदेवी यांच्यात चांगली मैत्री होती. अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांचा ‘खुदा गवाह’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर श्रीदेवींचा कमबॅक सिनेमा ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये अमिताभ यांनी कॅमिओ केला होता.