Join us  

'इश्क' सिनेमाला 26 वर्षे पुर्ण; काजोलने शेअर केला थ्रोबॅक फोटो, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 5:31 PM

फुल्ल ऑफ अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'इश्क' या चित्रपटाला आज 26 वर्षे पूर्ण झालीत.

फुल्ल ऑफ अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'इश्क' हा सिनेमा 1997 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजेच (28 नोव्हेंबर) ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आज 26 वर्षे पूर्ण झालीत. अजय देवगण, काजोल, आमिर खान आणि जुही चावला अशी तगडी स्टार कास्ट असलेला हा ड्रामा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत उतरला होता. आज 26 वर्षे झालीत तरीही 'इश्क'हा चित्रपट तितकेच मनोरंजन करतो. काही चित्रपट कधीही विस्मरणात जात नाही. 'इश्क' हे त्याचेच उदाहरण...

 काजोलने तिच्या इंस्टाग्रामवर अजय आमिर खान आणि जुही चावलासोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.  कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आम्ही दिवसभर स्वित्झर्लंडच्या टेकड्यांवर फिरलो, तेव्हा हा फोटो काढण्यात आला होता. आम्ही किती थकलो होतो, हे तुम्ही पाहू शकत नाही. “हे असे का आहे? सूर्य उशिरा मावळतो का इथे ? आपण काय फॅब कलाकार होतो ना'. काजोलने ही पोस्ट अजय देवगण आणि जुही चावला यांनाही टॅग केली आहे.

'इश्क'मध्ये अजय देवगण, काजोल, जुही चावला आणि आमिर खानसोबत दिलीप ताहिल, सदाशिव अमरापूरकर आणि जॉनी लीव्हरसह अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटात अजयने 'अजय राय'ची भूमिका साकारली होती, जो अतिशय श्रीमंत कुटुंबातील होता. तर आमिर खानने गॅरेज चालवणाऱ्या 'राजा अहलावत'ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात आमिर खान आणि अजय देवगण यांची मैत्री झाली. तर जुही चावला आणि काजोल त्याच्या लेडी लव्हच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटात जुहीने साकारलेली क्यूट आणि काहीशी विनोदी भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

टॅग्स :काजोलबॉलिवूडसिनेमाअजय देवगणजुही चावला