श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूूरसाठी ईशान खट्टरने पहिल्या मजल्यावरून मारली उडी, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST
यंग कपल ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास तयार आहे. त्यांचा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच हे दोघे चर्चेत आहेत. कारण दोघांना बºयाचदा पब्लिक प्लेसेसमध्ये बघण्यात आले. आता या दोघांचे असे काही फोटोज् समोर आले, जे बघून त्यांचे चाहते दंग राहतील.
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूूरसाठी ईशान खट्टरने पहिल्या मजल्यावरून मारली उडी, पाहा फोटो!
यंग कपल ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास तयार आहे. त्यांचा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच हे दोघे चर्चेत आहेत. कारण दोघांना बºयाचदा पब्लिक प्लेसेसमध्ये बघण्यात आले. आता या दोघांचे असे काही फोटोज् समोर आले, जे बघून त्यांचे चाहते दंग राहतील. गेल्या गुरुवारी सकाळी ईशान आणि जान्हवी जिममध्ये गेले होते. एक्सरसाइज संपल्यानंतर ईशानने असे काही केले, जे बघून जान्हवी कपूरही दंग झाली. ईशानने जान्हवी अगोदर कारमध्ये पोहोचण्यासाठी चक्क पहिल्या मजल्यावरून उडी मारली. फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की, कशा पद्धतीने ईशान बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरून खाली उतरण्याचा प्रयत्न करीत आहे. वास्तविक ईशानने जान्हवीला इम्प्रेस करण्यासाठी पहिल्यांदाच असा पराक्रम केला असे नाही, तर यापूर्वीदेखील त्याने तिला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडली नाही. करण जोहरच्या डायरेक्शनमध्ये बनत असलेल्या ‘धडक’मध्ये हे दोघे एकत्र बघावयास मिळणार आहेत. या दोघांचा ‘धडक’ हा चित्रपट मराठी ब्लॉकबस्टर ‘सैराट’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.