ईशाला शिकायचीय कॉमेडी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:23 IST
ईशाला शिकायचीय कॉमेडी'हेराफेरी ३' मध्ये अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत ईशा गुप्ता देखील स्क्रीन शेअर करणार आहे. ...
ईशाला शिकायचीय कॉमेडी'
ईशाला शिकायचीय कॉमेडी'हेराफेरी ३' मध्ये अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत ईशा गुप्ता देखील स्क्रीन शेअर करणार आहे. ती सध्या त्यांच्याकडून कॉमेडी शिकत आहे. ती म्हणते,' मी खरंच खुप भाग्यवान आहे की, अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत मी स्क्रीन शेअर करत आहे. त्या दोघांनाही कॉमेडीचे वेगवेगळे रंग आहेत. ते दोघे दोस्ताना मध्ये खुप चांगले दिसत होते. अभिषेक मला ब्लफमास्टरमध्ये आवडला. मला वाटतं मी त्यांच्याकडून जितकं शिकेल तेवढं कमीच आहे. मी कॉमेडी शिकण्यासाठी खुप उत्सुक आहे. ' नीरज व्होरा दिग्दर्शित हेराफेरी ३ हा कॉमेडी चित्रपट आहे. २00६ मधील फिर हेराफेरी चा तो सिक्वेल आहे. ईशाचा 'हमशकल्स' नंतर हा दुसरा कॉमेडी चित्रपट आहे. ईशासाठी हा चित्रपट म्हणजे आव्हानच आहे. ती या चित्रपटाला मात्र सुवर्णसंधी मानते.