Join us

​ ईशा गुप्ताने केली ट्रोलर्सची बोलती बंद! दिले सणसणीत उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 13:01 IST

अभिनेत्री ईशा गुप्ता हिच्यासाठी ट्रोल होणे नवीन नाही. ईशा अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगची बळी ठरली आहे. पण प्रत्येकवेळी ट्रोलर्सला ...

अभिनेत्री ईशा गुप्ता हिच्यासाठी ट्रोल होणे नवीन नाही. ईशा अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगची बळी ठरली आहे. पण प्रत्येकवेळी ट्रोलर्सला तिने सणसणीत प्रत्युत्तरही दिले आहे. ईशाच्या ताज्या ट्विटमुळेही असेच घडले. कालपरवा तिने केलेले एक ट्विट वेगाने व्हायरल झाले होते. हे ट्विट होते सीरियातील संकटाबद्दल. ईशाने सीरियातील संकटाकडे लक्ष वेधत, मानवता व लहान मुले मृत्युमुखी पडत आहेत, हे थांबायला हवे, असे टिष्ट्वट केले होते. या ट्विटसोबत सीरियाच्या रंक्तरंजित संघर्षात जखमी झालेल्या एका चिमुकलीचा फोटोही तिने पोस्ट केला होता.ईशाने हे ट्विट केले आणि लगेच ती ट्रोल होऊ लागली. अर्थात काहींनी तिचे समर्थन केले. पण अनेकांनी या ट्विटवरून ईशाला नाही नाही ते ऐकवायला सुरूवात केली. ‘ट्विट करून काय फायदा, तिथे जा अन् मदत कर. मला डिटेल्स पाठव, मी तुझे सीरियाचे तिकिट बुक करतो,’ असे एका युजरने तिला सुनावले. अन्य एका युजरनेही ईशाला फैलावर घेतले. ‘भारतात रोज हे घडतं. बलात्कार...इत्यादी...त्याबद्दलही काही पोस्ट कर,’ असे या युजरने सुनावले. अर्थात ईशाने अशाप्रकारे ट्रोल करणा-यांना खरमरीत उत्तर दिले. ‘मी कुठल्या देशाशी, धर्माशी आणि सरकारशी संबंधित आहे, याने मला फरक पडत नाही. मानवतेची क्रूर हत्या होतेय. लहान मुलं मरताहेत आणि हे थांबायला हवे,’ असे तिने लिहिले. यानंतरच्या दुस-या ट्विटमध्येही तिने ट्रोल करणा-यांना त्यांच्याच भाषेत सुनावले. ‘ट्रोल करणा-यांनो तुमची हीच खरी समस्या आहे की, तुम्हाला काहीही चांगले दिसत नाही. मानवतेतही तुम्हाला सीमा दिसतात. निष्पाप मुलांमध्येही तुम्ही धर्मावरून भेदभाव करतात,’ असे तिने लिहिले.ALSO READ : गाउनमधील फोटोंवरून ट्रोलर्सनी ईशा गुप्तावर पुन्हा साधला निशाणा, पाहा फोटो!सीरियातील गृहयुद्धात आतापर्यंत 4 लाखांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. या गृहयुद्धामुळे संपूर्ण देश उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ताज्या आकड्यानुसार, गत आठवडाभात कमीत कमी पाचशेवर लोकांचा मृत्यू झाला आहे. यात १२७ बालकांचा समावेश आहे.