Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईशा देओलने पहिल्यांदाच शेअर केला बेबी बंप दाखविणारा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 19:20 IST

आम्ही दोन महिन्यांपूर्वीच याबाबतची बातमी देऊन ईशा लवकरच आई होणार असल्याचे सांगितले होते. असे म्हटले जात आहे की, हिवाळ्याच्या सुरुवातीला ईशाच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

नुकतेच अभिनेत्री लीजा हेडन हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, तिने आपल्या चिमुकल्याचा एक फोटोही चाहत्यांसाठी शेअर केला होता. तसेच पतौडी परिवारातील लाडकी सोहा अली खान हीदेखील गर्भवती असल्याची बातमी समोर आली. आता अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या परिवारातही खूशखबर असून, हे दोघे लवकरच आजी-आजोबा होणार आहेत. होय, ईशा देओल गर्भवती असून, बेबी बंप दाखविणारा पहिलाच फोटो तिने सोशल अकाउंटवर शेअर केला आहे. होय, आम्ही दोन महिन्यांपूर्वीच याबाबतची बातमी देऊन ईशा लवकरच आई होणार असल्याचे सांगितले होते. असे म्हटले जात आहे की, हिवाळ्याच्या सुरुवातीला ईशाच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. आतापर्यंत ईशाचा प्रेग्नेंसीबाबतचा एकही फोटो समोर आला नव्हता, हा पहिलाच फोटो तिने शेअर केल्याने तिच्या चाहत्यांना काहीसा सुखद धक्का मिळाला असेल यात शंका नाही. ईशा या फोटोत तिची सर्वांत जवळची मैत्रिण आणि शेफ चीनू हिच्याबरोबर दिसत आहे. फोटोमध्ये चीनूदेखील प्रेग्नेंट असल्याचे स्पष्ट होत आहे. दोघीही फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. फोटोत ईशाने काळ्या रंगाची मॅक्सी आणि क्रीम रंगाचा श्रग घातलेला आहे.  ईशा गेल्या दोन्ही ‘रोडीज एक्स-२’मध्ये जजच्या भूमिकेत बघावयास मिळाली होती. याव्यतिरिक्त ती २०१५ मध्ये आलेल्या ‘किल देम यंग’ नावाच्या ड्रामा फिल्ममध्ये बघावयास मिळाली होती. तसेच २०११ मध्ये मम्मी हेमामालिनी यांच्या ‘टेल मी ओ खुदा’ या चित्रपटातही झळकली होती. याच दरम्यान तिने भरत तख्तानी यांच्याशी विवाह केला होता. सध्या तख्तानी आणि देओल परिवारात आनंदाचे वातावरण असून, हे दोन्ही परिवार चिमुकल्या पाहुण्याची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत.