बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या 'हक' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो यामी गौतमसोबत पाहायला मिळाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इमरान केवळ त्याच्या अभिनयामुळेच नाही, तर फिटनेसमुळेही खूप चर्चेत असतो. यामागे अभिनेत्याची कठोर मेहनत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, स्वतःला फिट ठेवण्यासाठी तो जवळपास दोन वर्षांपासून एकच डाएट घेत आहे. या कारणामुळे त्याची पत्नीही त्याच्यावर नाराज झाली आहे आणि तिने त्याच्यापासून दूर होण्याची धमकीही दिली आहे.
इमरान हाश्मी सध्या त्याच्या 'हक' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अभिनेता दररोज वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकताच तो एका यूट्यूबरच्या पॉडकास्टमध्ये गेला होता. तिथे त्याने सांगितले की, ''मी दोन वर्षांपासून एकच डाएट करत आहे. मला माहीत आहे की हे खूप कंटाळवाणे आहे. मी फक्त चिकन खिमा आणि रताळी खाण्यास सुरुवात केली आहे, कारण हे पचायला सोपे असते. माझा कुक हे संपूर्ण आठवड्यासाठी तयार करून ठेवतो आणि आम्ही दिवसातून दोनदा खातो."
इमरानच्या पत्नीने त्याला दिलीय सोडून जाण्याची धमकी
यावेळी अभिनेत्याने हा खुलासाही केला की, या डाएटमुळे त्याची पत्नी परवीन शाहनी खूप कंटाळली आहे. तिने तर या कारणामुळे अभिनेत्याला सोडण्याची धमकीही दिली आहे. अभिनेता म्हणाला, ''आम्ही दोन वर्षांपासून हा डाएट करत आहोत, ज्यामुळे ती त्रस्त झाली आहे. त्यामुळे अनेकदा ती मला सोडण्याचा प्लॅनही करते, जो तिने अजूनपर्यंत केलेला नाही, पण या डाएटमुळे लवकरच करू शकते.''
'हक' चित्रपटाबद्दलइमरान हाश्मी आणि यामी गौतमच्या 'हक' चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, तो ७ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा १९८५ च्या शाह बानो प्रकरणावर आधारित आहे. यात यामी गौतमने शाह बानोची भूमिका साकारली आहे, तर इमरान हाश्मी तिच्या पती मोहम्मद अहमद खानच्या भूमिकेत आहे.
Web Summary : Imran Hashmi's strict diet for fitness is reportedly causing marital discord. His wife, Parveen Shahani, is fed up with his monotonous chicken and sweet potato meals and jokingly threatens to leave him. He revealed this during promotion of his film 'Haq'.
Web Summary : इमरान हाशमी के सख्त डाइट से पत्नी परवीन शाहनी परेशान हैं। अभिनेता ने खुलासा किया कि उनकी पत्नी चिकन और शकरकंद के भोजन से तंग आ चुकी हैं और उन्हें छोड़ने की धमकी देती हैं। इमरान ने यह बात अपनी फिल्म 'हक' के प्रमोशन के दौरान बताई।