Join us

उदरनिर्वाहासाठी दुबईच्या नाइट क्लबमध्ये काम करतेय राखी सावंत? व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 10:21 IST

Rakhi Sawant :बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत चर्चेत येण्यासाठी एकही संधी सोडत नाही. दरम्यान आता राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) चर्चेत येण्यासाठी एकही संधी सोडत नाही. बऱ्याचदा ती तिच्या वायफळ बडबडमुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा तिचे विचित्र व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी तिचे बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. दरम्यान आता राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र आतापर्यंत हे स्पष्ट झालेले नाही की हा व्हिडिओ राखी सावंतचा आहे की नाही. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, राखी सावंत खूप कमी कपडे घालून एका डान्स बारमध्ये नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक चकित झाले आहेत आणि हा व्हिडीओ खरा आहे की नाही हे जाणून घेऊ इच्छितात.

या व्हिडीओमध्ये एक महिला शॉर्ट कपड्यांमध्ये एक विचित्र डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ राखी सावंतचा आहे आणि हा व्हिडिओ दुबईचा आहे. मात्र, या व्हिडीओच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही, हा व्हिडीओ खरोखर राखीचा आहे की नाही. चाहत्यांनी व्हिडिओला मॉर्फ्ड म्हटले आहे. 

याआधीही राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये ती थायलंडमधील एका पार्टीत नाचताना दिसली होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना वाटते की कदाचित राखीने आपला उदरनिर्वाह करण्यासाठी असे काम करायला सुरुवात केली असेल. त्याच वेळी, तिच्या काही चाहत्यांना असेही वाटते की हा राखीचा मॉर्फ्ड व्हिडीओ असू शकतो.

टॅग्स :राखी सावंत