Join us

​पुन्हा इरफानच्या ‘मदारी’ची रिलीज डेट बदलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 11:59 IST

‘द ग्रेट ग्रॅँड मस्ती’च्या निर्मात्यांनी ‘मदारी’च्या वाशू भगनानींना चित्रपटाची रिलीज डेट बदलण्याची विनंती केल्यानंतर अभिनेता इरफान खानच्या ‘मदारी’ सिनेमाची ...

‘द ग्रेट ग्रॅँड मस्ती’च्या निर्मात्यांनी ‘मदारी’च्या वाशू भगनानींना चित्रपटाची रिलीज डेट बदलण्याची विनंती केल्यानंतर अभिनेता इरफान खानच्या ‘मदारी’ सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. ‘मदारी’ सिनेमा १५ जुलैला प्रदर्शित होणार होेता, आता २२ जुलैला रिलीज होणार आहे. विशेषत: आतापर्यंत ‘मदारी‘ची दोनदा रिलीज डेट बदलण्यात आलीय. याआधी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘टीई3एन’ चित्रपटाच्या वेळी म्हणजेच १० जून रोजी मदारी सिनेमा रिलीज होणार होता. मात्र, तेव्हाही रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती आणि १५ जुलै ठरवण्यात आली होती. मात्र, आता ‘द ग्रेट ग्रँड मस्ती’मुळे पुन्हा रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.