असे आहे इरफान खानचे ड्रिम होम, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 16:49 IST
काहीकाळापूर्वीच अभिनेता इरफान खानने ट्विट करून मी एका दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितले होते. त्यानंतर चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दल चिंता व्यक्त ...
असे आहे इरफान खानचे ड्रिम होम, पाहा फोटो!
काहीकाळापूर्वीच अभिनेता इरफान खानने ट्विट करून मी एका दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितले होते. त्यानंतर चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. शिवाय इरफानला नेमका कोणता आजार झाला याविषयी अफवाही पसरविल्या जात होत्या. दरम्यान, इरफानने एक दिवसापूर्वीच ट्विट करून त्याच्या आजारपणाबद्दल खुलासा केला आहे. इरफान गेल्या १५ दिवसांपासून घरी आराम करीत आहे. सुरुवातीला त्याला जॉन्डिस होता. मात्र इरफानने त्याच्या आजाराचे ट्विट करून सगळ्यांनाच धक्का दिला आाहे. इरफानला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर नावाचा आजार झाल्याचे त्याने ट्विटमध्ये सांगितले आहे. या आजारावर योग्य उपचारासाठी इरफान विदेशात गेला आहे. दरम्यान, इरफान लोखंडवाला परिसरातील मड आयलेंडमधील एका अपार्टमेंटमध्ये पत्नी सुतापा आणि मुले बाबिल आणि आयनसोबत राहतो. हे त्याचे ड्रिम होम असून, एखाद्या पॅलेसप्रमाणे आहे. इरफानच्या घराचे इंटिरियर खूपच सुंदर पद्धतीने केले आहे. इंटिरियर डिझायनर शबनम गुप्ताने इरफानच्या आवडीनुसार घराचे डिझाइन केले आहे. अपार्टमेंटच्या पाचव्या फ्लोअवर असलेल्या फ्लॅटला ब्लू आणि व्हाइट थीमने सजविण्यात आले आहे. घराच्या आतमध्ये ज्याठिकाणी एक मोठा सोफा बघावयास मिळतो, त्याच ठिकाणी एक खाटही टाकण्यात आली आहे. संपूर्ण भितींवर निळा रंग देण्यात आला आहे. त्यावर मॉर्डन आर्ट आणि काही पेटिंग बघावयास मिळतात. फ्लॅटमध्ये लीविंग रूम, स्टडी रूम, गेम झोन, सीटिंग एरिया आदींचा समावेश आहे. ज्यास डिफरेंट स्टाइल आणि अॅँगलनी सजविले आहे. ७ जानेवारी १९६७ मध्ये जयपूर येथे जन्मलेल्या इरफानने नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये शिक्षण घेतले. त्याने बºयाचशा हिट चित्रपटांमध्ये काम केले. १९८८ मध्ये मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ‘लंच बॉक्स, मकबूल, लाइफ इन मेट्रो, द नेमसेक, गुंडे, पीकू, आन, साहब, बीवी और गॅँगस्टर-२, पान सिंह तोमर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफानने आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखविली.