Join us  

राजेश खन्ना आणि डिंपल यांच्या लग्नाबद्दलच्या काही खास गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 3:43 PM

'बाबू मोशाय जिन्दगी बड़ी होनी चाहिए लम्बी नहीं'... हे सर्वांच्या मनी ठसवणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज पुण्यातिथी. 18 जुलै 2012 रोजी लाखो-करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या 70-80च्या दशकातील या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.

'बाबू मोशाय जिन्दगी बड़ी होनी चाहिए लम्बी नहीं'... हे सर्वांच्या मनी ठसवणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज पुण्यातिथी. 18 जुलै 2012 रोजी लाखो-करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या 70-80च्या दशकातील या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. चाहत्यांमध्ये त्यांची ओळख 'काका' म्हणून होती. राजेश खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ 15 सुपरहिट चित्रपटांची मेजवानी चाहत्यांना दिली होती. अनेक तरूणींच्या गळ्यातील ते ताईत होते. बोल्ड अभिनेत्री डिंपल कपाडियाची राजेश खन्ना यांनी त्यांची अर्धांगिनी म्हणून निवड केली होती. जाणून घेऊयात त्यांच्या लग्नाबद्दलच्या काही खास गोष्टी...

- राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया हे दोघंही 70च्या दशकातले सुपरस्टार होते. बॉलिवूडचे पहिले वहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्यावेळची बोल्ड अभिनेत्री डिंपल कपाडियाने जेव्हा एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं त्यावेळी अनेक मासिकांनी याची दखल घेतली होती. त्यावेळचे सुपस्टार असलेले राजेश खन्ना तरूणींमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. डिंपलसोबत त्यांनी ज्यावेळी लग्न केलं त्यावेळी अनेक तरूणींनी आत्महत्या केल्याच्या चर्चाही झाल्या होत्या. 

- हे 70च्या दशकातलं सर्वात गाजलेलं लग्न होतं. आणखी एका कारणामुळे या लग्नाची जास्त चर्चा झाली होती ते म्हणजे ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी डिंपल फक्त 16 वर्षांची असून तिचा एकही चित्रपट त्यावेळी प्रदर्शित झालेला नव्हता. 

- राजेश खन्नांनी ज्यावेळी लग्नाचा प्रस्ताव डिंपलसमोर ठेवला त्यावेळी त्यांचे वय 31 वर्ष होतं. डिंपलने ज्यावेळी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घरच्यांना सांगितला त्यावेळी तिची आई या लग्नासाठी तयार नव्हती. पण डिंपलच्या वडिलांची या लग्नाला परवानगी होती. कारण त्यांचा जावई राजेश खन्नांसारखा सुपस्टार बनणार होता. काही दिवसांनी डिंपलच्या आई-वडिलांनीही या लग्नाला परवानगी दिली. 

- लग्नाच्या दिवशी मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी होती. चाहते आपल्या लाडक्या सुपस्टारच्या वरातीमध्ये सामील झाले होते. या लग्नासाठी संपूर्ण बॉलिवूड पोहोचलं होतं. त्यावेळी हे लग्न इतकं गाजलं होतं की, त्यावेळी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्याआधी राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नाची एक क्लिप दाखवण्यात येत असे. 

- बॉबी या चित्रपटाने डिंपलच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली होती. हा चित्रपट राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नानंतर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर डिंपल देशभरातील तरूणांच्या गळ्यातील ताईत बनली होती. 

- राजेश आणि डिंपल यांना दोन गोड मुली झाल्या. ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना यांदोघींच्या जन्मानंतर त्याचं कुटुंब पूर्ण झालं होतं. पण हे लग्न जास्त दिवस टिकलं नाही. डिंपल आपल्या दोन मुलींना घेऊन वेगळं राहू लागल्या. या दोघांनी घटस्फोट घेतला नाही, पण ते वेगळे राहत होते. 

टॅग्स :बॉलिवूडराजेश खन्नाडिम्पल कपाडियालग्न