Join us

पोर्न पाहण्यात भारतीयांची सनी लिओनीला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 12:52 IST

इंटरनेट, स्मार्टफोनच्या युगात पोर्न पाहणाऱ्यांची संख्या कमालीची वाढलेली आहे. जगभरात पोर्न पाहणाऱ्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे, असे एका ...

इंटरनेट, स्मार्टफोनच्या युगात पोर्न पाहणाऱ्यांची संख्या कमालीची वाढलेली आहे. जगभरात पोर्न पाहणाऱ्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे, असे एका पोर्न वेबसाइटने केलेल्या सर्वेक्षणातून हे उघड झाले आहे. अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा क्रमश: पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.विशेष म्हणजे या अनोख्या क्रमवारीमध्ये यंदा भारताचा क्रमांक कमी झाला आहे. २०१५च्या तुलनेत २०१६मध्ये पोर्न पाहण्यात भारताचा जागतिक क्रमवारीत क्रमांक घसरला आहे. गेल्या वर्षीय याच यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. भारतीय यूजर्सनी नेटवर सर्वाधिक सनी लिओनीला सर्च केले आहे. विशेष म्हणजे भारतात पोर्न पाहणाऱ्यांमध्ये 30 टक्के महिलांचा समावेश आहे. तसेच 'मेड इन इंडिया' पोर्न पाहण्याला भारतीय सर्वाधिक पसंती देतात.दरम्यान, रिपोर्टनुसार पोर्न सर्च करताना भारतीय यूजर्सनी सर्वाधिक इंडियन हा शब्द सर्च केला आहे. पोर्न संबंधित सर्चमध्ये टॉप 10च्या लिस्टमध्ये 'इंडियन आंटी विद यंग' एक नंबरवर आहे. टॉप सर्चमध्ये महिलांनी 'लेस्बियन' हा शब्द सर्वाधिक सर्च केला आहे. तर पुरुषांनी 'मिल्फ' हा शब्द जास्त करून सर्च केला आहे. भारतात सर्वाधिक पोर्न पाहण्यात १८ ते २४ वर्षांमधील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.पोर्न पाहणारे ‘स्त्रीवादी’पोर्न पाहिल्यामुळे महिलांकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याची वृत्ती वाढते, असे मानणारा एक प्रवाह आहे. मात्र, ‘वेस्टर्न आॅन्टेरिओ विद्यापीठा’तील संशोधकांनी यासंबंधी केलेल्या अध्ययनानुसार पोर्न पाहणारे लोक उलट महिलांना समान मानतात, त्यांना समान वागणूक देतात. सुमारे २८ हजार लोकांनी भाग घेतलेल्या जनरल सोशल सर्व्हेमधून गोळा झालेल्या डेटाचे विश्लेषन करून त्यांनी हा निष्कर्ष काढला होता. २३ टक्के लोकांनी मान्य केले की ते पोर्न पाहतात आणि महिलांना ते समान मानतात. घराबाहेर पडून नोकरी करण्यासाठीसुद्धा ते सकारात्मक होते. क्रोशियन संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार जे लोक सेक्स अ‍ॅडिक्ट आहेत, त्यांना पोर्न पाहण्यात काही रस नाही. उलटपक्षी त्यांना पोर्न पाहणे लाजिरवाणे वाटते. संशोधक म्हणतात की, याचा अर्थ असा नाही की पोर्न पाहावे. पण पोर्न पाहिल्याने महिलांप्रती दृष्टीकोन कलूषित होत नाही, एवढे मात्र खरे!