इंदर कुमारने त्याच्या करिअरमध्ये जवळपास २० चित्रपट केले. यातील बहुतांश चित्रपटांमध्ये त्याला ‘ए’ लिस्ट सुपरस्टार्ससोबत काम करावे लागले. कारण काही चित्रपटांमध्ये तो मुख्य अभिनेत्याच्या भावाच्या भूमिकेत झळकला तर काही चित्रपटांमध्ये त्याला मुख्य अभिनेत्याच्या विरोधात म्हणजेच खलनायकाची भूमिका साकारावी लागली; मात्र त्याने सलमानसोबत केलेल्या चित्रपटांची तºहा काही वेगळीच म्हणावी लागेल. त्यामुळेच कदाचित सलमान आणि इंदरला इंडस्ट्रीमध्ये सख्ख्या भावासारखे ओळखले जाते. बातमीत दिलेले फोटो बघून तुमच्याही ही बाब कदाचित लक्षात येईल.
दरम्यान, इंदरने नुकतेच दोन चित्रपटांचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे आगामी दोन चित्रपटांमध्ये तो झळकणार आहे. परंतु दुर्दैवाने या चित्रपटांचे यश बघायला तो नसेल. त्याचबरोबर सलमानसोबत इंदरचे नाते खूपच चांगले राहिले आहे. शिवाय सलमान त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ची शूटिंग पूर्ण करून नुकताच मोरोक्को येथून मुंबईत परतला आहे. त्यामुळे सलमान इंदरच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.