होय, २३ वर्षीय मॉडेलने जेव्हा इंदरवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप लावला तेव्हा तो खूपच डिप्रेशनमध्ये गेला. मॉडेलच्या तक्रारीवरून इंदरवर कलम ३७६ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात इंदरला पोलीस कोठडीदेखील मिळाली होती. कोठडीत त्याने स्पष्ट केले होते की, मॉडेल आणि माझ्यात जे काही घडले ते दोघांच्या संमतीने घडले आहे. पुढे जून २०१४ मध्ये याप्रकरणात जामीन मिळाला. या प्रकरणामुळे इंदरची छबी चांगलीच मलीन झाली. याच विचाराने तो असा काही डिप्रेशनमध्ये गेला, ज्यातून तो अखेरपर्यंत सावरला नाही. तो नशेच्या आधीन गेला. शिवाय इंडस्ट्रीमधूनही काहीसा बाहेर पडत गेला.
या प्रकरणात इंधरची पत्नी पल्लवीने त्याला खूप सपोर्ट केला होता. कारण तिने यावेळेस जे वक्तव्य केले होते, ते धक्कादायक होते. पल्लवीने म्हटले होते की, हा बलात्कार नसून, केवळ ‘वन नाइट स्टॅण्ड’ आहे. पल्लवी सराफ इंदरची दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीपासून इंदरला एक मुलगी आहे. पल्लवीने जेव्हा हे वक्तव्य केले होते, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता. पल्लवीचे इंदरच्या मदतीला धावून जाणे इंदरटला आधार देणारे ठरले.
१९९६ मध्ये ‘मासूम’मधून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणाºया इंदरने एकापाठोपाठ अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याला स्वत:ला सुपरस्टार म्हणून ओळख निर्माण करायची होती. ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘गजगामिनी’, ‘खिलाडियों का खिलाडी’ यांसारख्या चित्रपटांनी त्याला ओळखही निर्माण करून दिली. परंतु अजून त्याला बराचसा पल्ला गाठायचा होता. अशात बलात्कार प्रकरणात तो असा काही गोवला गेला की, ज्यातून तो डिप्रेशनमध्ये गेला. दारूच्या आहारी जाताना तो इंडस्ट्रीमधून बाहेर पडला. सलमान खानने त्याला सावरण्याचा प्रयत्नही केला, परंतु या गुन्ह्यांचे शल्य त्याच्या मनात अखेरपर्यंत राहिले, असेच म्हणावे लागेल.