Join us

"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 13:04 IST

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रानेही घरी ध्वजारोहण करत स्वातंत्र्यदिवस साजरा केला. याचा व्हिडीओ समोर आला आहे. पण, यावेळी शिल्पा शेट्टीची बहीण शमिताकडून मात्र मोठी चूक झाली आहे. 

Independence Day 2025: आज देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. आज भारत ७९वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही ध्वजारोहण करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रानेही घरी ध्वजारोहण करत स्वातंत्र्यदिवस साजरा केला. याचा व्हिडीओ समोर आला आहे. पण, यावेळी शिल्पा शेट्टीची बहीण शमिताकडून मात्र मोठी चूक झाली आहे. 

इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये राज कुंद्रा त्याच्या मुलांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या व्हिडीओ शमिता शेट्टीही उभी असल्याचं दिसत आहे. 'जन गन मन' हे राष्ट्रगीत चालू असल्याचं व्हिडीओत ऐकायला मिळत आहे. पण हे चालू असतानाच शमिता शेट्टी स्थिर उभं न राहता हालचाल करत असल्याचं दिसत आहे. शमिता शेट्टीची ही वागणूक नेटकऱ्यांना खटकली आहे. राष्ट्रगीताचा अवमान केल्याने शमिता शेट्टीला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे. 

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. "राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", अशी कमेंट करत एकाने संताप व्यक्त केला आहे. तर दुसऱ्याने "तिच्यापेक्षा त्या लहान मुलीला जास्त मॅनर्स आहेत", अशी कमेंट केली आहे. "शमिताला आधी सांगा की उभं कसं राहतात", "राष्ट्रगीताला कसं उभं राहतात हे शमिताला माहीत नसावं", अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :स्वातंत्र्य दिनसेलिब्रिटी