पाच वर्षांनंतर परततेय, इमरान हाश्मीची ‘ही’ अभिनेत्री!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 12:46 IST
इमरान हाश्मीसोबत ‘जन्नत’ मधून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री सोनल चौहान गेल्या पाच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कुठेही दिसलेली नाही. हिंदी चित्रपटांतून ती ...
पाच वर्षांनंतर परततेय, इमरान हाश्मीची ‘ही’ अभिनेत्री!!
इमरान हाश्मीसोबत ‘जन्नत’ मधून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री सोनल चौहान गेल्या पाच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कुठेही दिसलेली नाही. हिंदी चित्रपटांतून ती जणू गायब आहे. पण सोनलच्या चाहत्यासांठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सोनल पाच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. सोनलने जेपी दत्ता यांचा ‘पलटन’ साईन केला आहे. यानंतर सोनलच्या हाती आणखी एक मोठा चित्रपट लागला आहे. होय, महेश मांजरेकर यांच्या गँगस्टर ड्रामात सोनल लीड रोलमध्ये दिसणार आहे. सोनलसोबत या चित्रपटात अभिनेता विद्युत जामवाल आणि अभिनेत्री श्रुती हासन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही़ पण स्क्रिप्ट तयार आहे. स्टारकास्टही फायनल झालीय. लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होतेय. विजय गलानी व प्रतिक गलानी निर्मित या चित्रपटासाठी निश्चितपणे सोनल कमालीची उत्सूक आहे. महेशजींसोबत काम करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी त्यांची खूप मोठी चाहती आहे, असे तिने म्हटले आहे.यापूर्वी सोनल ‘थ्रीजी’ या चित्रपटात दिाली होती. पण तिचा हा चित्रपट दणकून आपटला होता. हिंदी चित्रपटात नशीबाचे फासे सरळ पडत नसल्याचे पाहून सोनलने तामिळ तेलगू फिल्म इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला होता. यादरम्यान तिने अनेक तामिळ व तेलगू चित्रपटांत काम केले. सोनलने सर्वप्रथम हिमेश रेशमियाच्या ‘सुरूर’ या म्युझिक अल्बममध्ये ब्रेक मिळाला होता. पुढे ‘जन्नत’मधून तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. यानंतर काही चित्रपटांत सोनल दिसली. पण या चित्रपटांनी तिला बॉलिवूडमधील तिचे स्थान टिकवता आले नाही. आता पाच वर्षांनंतर सोनल पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करू पाहतेय, यात तिला किती यश येते, ते बघूच.ALSO READ : सोनल चौहान ‘या’ अभिनेत्रीच्या मुलाच्या प्रेमात!सोनल एका सुपरस्टार अभिनेत्रीच्या मुलाला डेट करत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, सोनल ज्याला डेट करतेय, तो तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. हा स्टारकिड्स दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू आहे. होय, अभिमन्यू दासानी आणि सोनल चौहान या दोघांच्या डेटींगच्या बातम्या सध्या बॉलिवूडमध्ये चर्चिल्या जात आहे.