Join us

दिशासोबतचे नाते मी लपवत नाहीये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 11:12 IST

 टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांची रिलेशनशिप हा सध्या ‘बी टाऊन’चा हॉट विषय आहे. बॉलीवूडमधील हे कलाकार रिलेशनशिपमध्ये असल्याचेही ...

 टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांची रिलेशनशिप हा सध्या ‘बी टाऊन’चा हॉट विषय आहे. बॉलीवूडमधील हे कलाकार रिलेशनशिपमध्ये असल्याचेही कबूल करत नाही आणि नाकारतही नाहीत. ते दोघे पॅरिसमध्ये ‘बेफिक्रा’च्या शूटींगसाठी एकत्र आले होते.दिशा आणि टायगर कितीही प्रश्न टाळत असतील तरीही मीडियामध्ये ते एकत्र असल्याच्याच चर्चा आहेत. ‘अ फ्लार्इंग जट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित पत्रकार परिषदेत टायगरला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला,‘ते ठीक आहे. पण आम्ही कलाकार आहोत.मी तिच्यासोबतचे नाते कधीच लपवले नाही. मला तिच्यासोबत बाहेर जायला आवडते. तिच्यासोबत कॉफी प्यायलाही आवडते. पण, आमच्यामध्ये त्यापेक्षा जास्त काहीही नाहीये.’