Join us

'द गर्ल ऑन द ट्रेन’ची चर्चा असल्याने परिणिती चोप्रा उत्सुक तर आहेच पण.........

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 13:35 IST

परिणीती चोप्राच्या 'द गर्ल ऑन द ट्रेन'ची झलक छोटी आहे पण दमदार आहे.

आगामी  'द गर्ल ऑन द ट्रेन' या सिनेमात परिणीती एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. यात ती एक अंडरकव्हर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. ती एका घटस्फोटित महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. समोर आलेल्या टीझरनमध्येच  परिणीती चोप्रा वेगळ्या अंदाजात दिसते आहे. परिणीती आतापर्यंत रोमँटिक ड्रामा सिनेमात अधिक दिसली होती, पण आता ती थ्रिलरमध्ये सिनेमात दिसणार. परिणीती चोप्राच्या 'द गर्ल ऑन द ट्रेन'ची झलक छोटी आहे पण दमदार आहे.

या सिनेमाबाबत सोशल मीडियावर ती चर्चा करताना दिसते. यामधून ती जितकी या सिनेमासाठी उत्सुक असून चिंताही तिला सतावत असल्याचे जाणवते. अनेक गोष्टी परिणितीच्या मनात दाटून आल्या आहे. आपली आगामी फिल्म प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल हा विश्वास तिला वाटतो. या सिनेमाच्या टीझरचे बरेच कौतुक झाले असले तरीही ट्रेलर मोठ्या प्रमाणावर जादू घडवून आणेल असे परी’ला वाटते.

 

 “टीजीओटीटीच्या टीझरमुळे प्रेक्षकवर्ग आशेने फिल्मची वाट पाहत असल्याने माझ्या मनात उत्साहासोबत थोडी काळजीही वाटत असल्याचे तिने म्हटले  आहे. या फिल्मचा ट्रेलर आणि त्यानंतर सिनेमा पाहिल्यानंतर टीझर इतकेच प्रेम प्रेक्षकांकडून मला मिळेल, याविषयी आत्मविश्वास वाटतो!,” असे परिणिती म्हणाली. या सिनेमातील तिचा हटके अंदाज प्रत्येकाला आश्चर्यात टाकणारा ठरेल.  

टीजीओटीटी या सारख्याच नावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकाची पावती मिळालेल्या बेस्टसेलरवर 2016 मध्ये हॉलीवूड फिल्म येऊन गेली आहे. त्यात एमिली ब्लंट मुख्य भूमिकेत झळकली होती. या सिनेमाच्या बॉलीवूड व्हर्जनमध्ये परिणिती चोप्राएका हरवलेल्या व्यक्तीच्या चौकशीत ती फसते आणि मग गुपिते प्रकाशात येतात असे या सिनेमाचे कथा आहे.

टॅग्स :परिणीती चोप्रा