ग्रॅमीत सादरीकरणासाठी मी उत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:45 IST
ग्रॅमीत सादरीकरणासाठी मी उत्सुक : अनुष्का शंकरयंदाच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान वाटत असल्याची ...
ग्रॅमीत सादरीकरणासाठी मी उत्सुक
ग्रॅमीत सादरीकरणासाठी मी उत्सुक : अनुष्का शंकरयंदाच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान वाटत असल्याची भावना सितारवादक अनुष्का रविशंकर हिने व्यक्त केली आहे. ग्रॅमी सारख्या मोठ्या पुरस्कार सोहळ्यात सादरीकरण हा मुळातच मोठा सन्मान असल्याचे वाटत असलेल्या अनुष्काचेही यंदाच्या सोहळ्यात ‘वर्ल्ड म्युझिक अल्बम’ प्रकारात नॉमिनेशन आहे. येत्या 15 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या या सोहळ्यात सादरीकरण करणारी अनुष्का ही पहिली भारतीय ठरणार आहे. सतारवादक पंडित रविशंकर यांची कन्या असलेल्या अनुष्काचा भारतीय संगीतावर आधारित ‘होम’ हा अल्बम जगातील सर्वाेत्तम अल्बम प्रकारात ग्रॅमीसाठी नॉमिनेट झालेला आहे. ‘होम’ हा अल्बम पंडित रविशंकर यांनी निर्माण केलेल्या रागावर आधारित आहे.