Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बॅटल फॉर बित्तोरा’ साठी मी उत्सुक-सोनम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 16:08 IST

लेखक अनुजा चौहान यांच्या ‘बॅटल फॉर बित्तोरा’ या प्रसिद्ध पुस्तकाची तुम्हाला कल्पना आहे ना? या पुस्तकावर आता चित्रपट साकारण्यात ...

लेखक अनुजा चौहान यांच्या ‘बॅटल फॉर बित्तोरा’ या प्रसिद्ध पुस्तकाची तुम्हाला कल्पना आहे ना? या पुस्तकावर आता चित्रपट साकारण्यात येणार असल्याचे कळतेय. रिहा कपूर निर्मित आणि शशांक घोष दिग्दर्शित ‘बॅटल फॉर बित्तोरा’ चित्रपटात ‘मस्सकली गर्ल ’ सोनम कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटाबद्दल सोनम प्रचंड उत्सुक आहे. याविषयी बोलताना ती म्हणते,‘ मला अनुजा चौहान यांचं काम आवडतं. तिने तरूण मुलींच्या भावविश्वावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. ‘द झोया फॅक्टर’ आणि ‘बॅटल आॅफ बित्तोरा’ ही काही समकालीन पुस्तकं आहेत.ही पुस्तकं सिनेमॅटिक असून मी ‘बित्तोरा’ ला स्क्रिनवर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहे. ’ सध्या ती ‘वीरें दी वेडिंग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असून स्वरा भास्कर, करिना कपूर खान आणि शिखा तल्सानिआ हे तिच्यासोबत यात दिसतील.