Join us

इलियाना-अक्षयची सेटवर धम्माल...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 16:02 IST

इलियाना डिक्रुझ आणि अक्षय कुमार यांचा ‘रूस्तम’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात दोघांनीही पती-पत्नीची भूमिका केली आहे. ...

इलियाना डिक्रुझ आणि अक्षय कुमार यांचा ‘रूस्तम’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात दोघांनीही पती-पत्नीची भूमिका केली आहे. चित्रपट जरी खुप गंभीर असा असेल तरी त्याच्या शूटींगला मात्र टीमने प्रचंड धम्माल केली.इलियाना याविषयी सांगतांना म्हणते,‘ चित्रपटाची शूटींग करताना आम्ही खुप मजा करायचो. त्यातील प्रसंग मला आठवतोय तो म्हणजे आमचे दिग्दर्शक टिनू सुरेश देसाई अक्षयसहित सर्व पुरूषांना म्हणायचे,‘मी अ‍ॅक्शन म्हणायच्या अगोदर तुम्ही तुमच्या पॅन्ट्स वर ओढा!’  आता असे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?वेल ते यासाठी की, ‘व्होग’ या ब्रँण्डचे कपडे कलाकारांसाठी आले होते. त्यांचे बॉटम्स हे फार लांब होते. त्यामुळे त्यांना वर ओढणे भाग होते. त्यामुळे आम्ही सेटवर तो सीन आला की खुप हसायचो. ते म्हणायचे,‘ चलो सब लोग पँट उपर खींच लो.’