Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुहाना खाननंतर इलियाना डिक्रूज फोटो करत म्हणाली- मला चिंता वाटायची की मी ...

By गीतांजली | Updated: October 2, 2020 18:29 IST

इलियानाच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर ती शेवटची पागलपंतीमध्ये दिसली होती.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने अलीकडेच तिच्या सावळ्या रंगाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. ज्यात सुहानाने सांगितले की, तिच्या सावळ्या रंगावरुन नेहमी नेगेटीव्ह कमेंट केले जातात. यानंतर आता अभिनेत्री इलियाना डिक्रूझने तिचा ब्लॅक बिकनीमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

फोटो शेअर करत इलियानाने लिहिले, मला नेहमी चिंता व्हायची की मी कशी दिसतेय. मला चिंता होते की माझे हिप्स खूप रुंद आहेत आणि कंबर लहान, पोट फ्लॉट नाही, नाक सरळ नाही, ओठ ठीक नाही. मला चिंता असायची की मी खूप उंच नाही आहे. दिसायला फारशी सुंदर नाही, जास्त स्मार्ट नाही.  इलियाना पुढे लिहिते, मला या गोष्टीची जाणीव नाही झाली की मी परफेक्ट होण्यासाठी नाही जन्मले. मी जागाच्या हिशोबाप्रमाणे स्वत:ला सुंदर बनवण्याचा प्रयत्न थांबवला आहे. 

इलियानाच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर ती शेवटची पागलपंतीमध्ये दिसली होती. ती. या मल्टिस्टारर चित्रपटाकडून इलियानाला बºयाच अपेक्षा होत्या. हा सिनेमा दणकून आपटला आणि इलियानाचा अपेक्षाभंग झाला. लवकरच ती अभिषेक बच्चनसोबत द रेड बुल सिनेमात दिसणार आहे.

 

टॅग्स :इलियाना डीक्रूज