इलियानाचा बॉयफ्रेन्ड अॅन्ड्र्यू एक फोटोग्राफर आहे. आॅस्ट्रेलियात राहणा-या अॅन्ड्र्यूला इलियानाचे फोटो काढणे आवडते. इलियानाचे अनेक फोटो त्याने काढले आहेत. विशेष म्हणजे, इलियानाने यापैकी अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी इलियानाचा बाथटममधील न्यूड फोटो चांगलाच गाजला होता. अॅन्ड्र्यूनेच तिचे हे हॉट फोटोशूट केले होते.
सध्या या दोघांची लव्हस्टोरी गाजत असताना यापूर्वीही एकदा या लव्हबर्ड्सनी गूपचूप लग्न केल्याची बातमी आली होती. अर्थात तेव्हा ही बातमी निव्वळ अफवा ठरली होती . पण आता ही अफवा नसून खरोखरीच हे लव्हबर्ड्स लग्नाच्या बेडीत अडकल्याचे दिसतेय. आता इलियाना या लग्नाची अधिकृत घोषणा कधी करते ते बघूच.
ALSO READ : shocking!! त्या काळात इलियाना डिक्रूजच्या मनात रोज यायचे आत्महत्येचे विचार!
अलीकडे एका मुलाखतीत इलियानाला लग्नाबद्दल विचारले असता, कधीकधी सस्पेंस आवश्यक असतो, असे इलियाना म्हणाली होती. मी सगळचं जगजाहिर करायला लागले तर लोकांना माझ्यात काय इंटरेस्ट उरेल, असे ती म्हणाली होती.