Join us  

IIFA Awards 2018: जाणून घ्या विजेत्यांची नावे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 11:23 AM

अभिनेत्री विद्या बालन आणि मानव कौल यांच्या ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ग्लॅमर, एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स आणि आयफाच्या बाहुलीवर कुणाचे नाव कोरले जाते, याची क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्कंठा अशा वातावाणात जुनमध्ये आयफा अवार्ड्स 2018 च्या रंगारंग सोहळयाची मुख्य रात्र बँकॉकमध्ये रंगली होती आणि हाच पुरस्कार सोहळा नुकताच टिव्हीवर प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

या कार्यक्रमाच्या ग्रीन कार्पेटवर श्रद्धा कपूर, क्रिती सॅनन, अनिल कपूर, अर्जुन कपूर, वरूण धवन, कार्तिक आर्यन यांसारखे अनेक कलाकार अतवतले तर करण जोहर आणि रितेश देशमुख यांच्या जुगलबंदीने स्टेजचा ताबा घेतला आणि आयफाची रात्र उत्तरोत्तर रंगत गेली. सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात तब्बल २० वर्षांनंतर परफॉर्मन्स सादर केला. अभिनेत्री विद्या बालन आणि मानव कौल यांच्या ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आयफा पुरस्कार विजेत्यांची यादी...

बेस्ट फिल्म : तुम्हारी सुलू

बेस्ट अॅक्टर : इरफान खान, हिंदी मीडियम

बेस्ट अॅक्टर फिमेल : श्रीदेवी, मॉम

बेस्ट सर्पोटिंग अॅक्टर मेल : नवाजुद्दीन सिद्दीकी, मॉम

बेस्ट सर्पोटिंग अ‍ॅक्टर फीमेल : मेहर हिज, सीक्रेट सुपरस्टार

 बेस्ट स्टोरी : अमित मसूरकर,  न्यूटन 

 बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल) : अरजीत सिंग, हवाएं (जब हैरी मेट सेजल)

 बेस्ट प्लेबॅक सिंगर (फीमेल) : मेघना मिश्रा, मैं कौन हूं  (सीक्रेट सुपरस्टार)

 बेस्ट बॅकग्राउंड स्कोर: प्रीतम चक्रवर्ती, जग्गा जासूस 

 सर्वश्रेष्ठ गीत: नुसरत फतेह अली खान, ए वन मेलोडी फना आणि मनोज मुंतशीर,  मेरे रश्के कमर  (बादशाहो)

 बेस्ट कोरियोग्राफी: विजय गांगुली आणि रुएल डोसन वारिन्दानी, जग्गा जासूस

 बेस्ट स्पेशल इफेक्ट्स: एनआई वीएफएक्स , जग्गा जासूस

 बेस्ट स्क्रीनप्ले: नितेश तिवारी आणि श्रेयश जेनस, बरेली की बर्फी

 बेस्ट डॉयलॉग: हितेश केवल्य, शुभ मंगल सावधान

 बेस्ट एडिटिंग: व्यंकट मैथ्यू, न्यूटन

बेस्ट साउंड डिजाइन: दिलीप सुब्रमण्यम आणि गणेश गंगाधरन, टाइगर जिंदा है 

 

टॅग्स :आयफा अॅवॉर्डश्रीदेवीइरफान खानविद्या बालन