व्हिडीओमध्ये मीशा डॅडी शाहिदच्या कडेवर असून, डॅडीच्या फेव्हरेट गॉगलबरोबर ती खेळत आहे. शाहिददेखील फनी मुडमध्ये बघावयास मिळत आहे. एका पाठोपाठ एक फनी फेसेस तो बनविताना दिसत आहे. दोघेही या फोटोमध्ये क्युट दिसत असल्याने त्यांच्या चाहत्यांकडून हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे. शिवाय शाहिदच्या चाहत्यांकडूनच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही केला जात आहे.
महिनाभरानंतर मीशाचा बर्थ डे सेलिब्रेट केला जाणार असून, मम्मी मीरा आणि शाहिद यासाठी विशेष प्लॅन करीत असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच शाहिद आणि मीराच्या लग्नाचा वाढदिवस होता. दोघांनी अतिशय साध्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला होता. मात्र मीशाचा बर्थ डे धुमधडाक्यात सेलिब्रेट करण्याचा प्लॅन मीरा करीत आहे. सूत्रानुसार प्री-बर्थ डेची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.